शीघ्रपतनाविषयी जाणून घ्या…

16 12,950

शीघ्रपतन म्हणजे नक्की काय?

संभोगादरम्यान वेळेआधीच लिंगातून वीर्य बाहेर येणे म्हणजे शीघ्रपतन. असं म्हणतात की साधारणतः संभोग 3-5 मिनिटे चालतो. अर्थात प्रत्येकासाठी हा काळ कमी जास्त असू शकतो. मात्र अपेक्षेपेक्षा कमी वेळात वीर्य बाहेर येत असेल तर दोन्ही जोडीदारांची निराशा होऊ शकते. शीघ्रपतन कोणत्याही वयात होऊ शकते आणि ही लैंगिक समस्यांमधली सर्वात जास्त आढळणारी समस्या आहे.

शीघ्रपतन का होतं?

तरूणपणी जेव्हा लैंगिक संबंधांचा अनुभव नसतो तेव्हा आपल्याला ‘सगळं’ जमेल ना या चिंतेमुळे शीघ्रपतन होऊ शकतं. काही काळाने यावर ताबा येतो. यासोबत इतरही कारणांमुळे ही समस्या निर्माण होते. सेक्सविषयी भीती किंवा अति आतुरता, कामाचा किंवा इतर प्रकारचा ताण, लैंगिक संबंधाचा आधीचा अनुभव फारसा आनंददायी नसेल तर त्यामुळेही शीघ्रपतन होऊ शकतं. काही वेळा काही शारीरिक आजारही कारणीभूत ठरतात. कधी कधी तर जोडीदाराविषयी आकर्षण आणि प्रेम नसेल तरी शीघ्रपतन होऊ शकतं.

यावर उपाय काय?

सेक्सची सवय झाली की हळू हळू यावर ताबा येतो. रिलॅक्सेशन पद्धतींचा उपयोग होऊ शकतो. सेक्स आणि संभोगाबद्दलची चिंता, दडपण दूर करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा उपयोग होईल. तसंच ऑरगॅझम कधी येतो, त्याआधी शरीरात, मनात काय संवेदना निर्माण होतात याचं निरीक्षण करा. त्या क्षणी समागमाचा वेग थोडा मंदावण्याचा प्रयत्न केला तर लवकर वीर्य बाहेर येणार नाही. यासाठी जोडीदाराचं सहकार्य आवश्यक आहे आणि मुख्य म्हणजे एकमेकांशी संवादही तितकाच महत्त्वाचा आहे.

वैद्यकीय मदत, सेक्सॉलॉजिस्टचा सल्ला आणि काही वेळा औषधांचा उपयोग होऊ शकतो. न घाबरता आणि न लाजता आपली समस्या डॉक्टरांना सांगा. दोन्ही जोडीदारांनी दोषारोप न करता एकमेकांना समजून घेतलं, सेक्स सोडून एरवीही जवळीक वाढवली, धीर दिला तर त्याचा परिणाम निश्चित चांगला होऊ शकेल.

 

शीघ्रपतन : स्टार्ट – स्टॉप – स्टार्ट

 

16 Comments
 1. BALIRAM REVANSIDDHA JETHE says

  समाधान वाटले

 2. सतीश says

  पहिल्यादा सेक्स करत होतो 6 ते 7 वर्ष सेक्स केले आहे आत सेक्स करत असताना लिंग कमी ताठ होतो त्या वर काय उपाय

  1. I सोच says

   पहिलं आपण हे समजून घेऊया की पुरुषांच्या लिंगात ताठरपणा येतो म्हणजे काय होतं. लैंगिक उत्तेजना मिळाल्यामुळे मेंदू अशा वेळी रक्ताचा प्रवाह लिंगाच्या दिशेने वाढवतो आणि त्या प्रवाहाच्या दाबामुळे लिंगात ताठरता येते. परंतु या प्रक्रियेवर त्या त्या व्यक्तीचं शारीरिक स्वास्थ्य, मनस्वास्थ्य, वय इत्यादीचा प्रभाव असतो. वयानुसार पुरुषांमध्ये कार्यरत असलेल्या टेस्टेरॉन या विशिष्ट सम्प्रेरकाचे प्रमाण ही कमी होत जाते ज्यामुळे लैंगिक उत्तेजनही कमी होत जाते आणि हे नैसर्गिक किंवा स्वाभाविक आहे. शारीरिक आणि मानसिक अस्वास्थ्य असेल, ताणताणाव असतील तर अशा स्थितीतही शरीर संबंधांप्रति अनिछा, अल्पकालीन ताठरता, वीर्य लवकर बाहेर येणे अशा स्थितीचा सामना करावा लागतो. लिंग शिथिलतेचा प्रश्न हा अनेक पुरुषांना भेडसावत असतो. जर यामुळे लैंगिक सुख अनुभवण्यास त्रास होत असेल तर त्याला आपण समस्या म्हणू शकतो यामुळे दोन्ही जोडीदारांची निराशा होऊ शकते.

   संभोगादरम्यान वेळेआधीच लिंगातून वीर्य बाहेर येणे म्हणजे शीघ्रपतन. असं म्हणतात की साधारणतः संभोग 3-5 मिनिटे चालतो. अर्थात प्रत्येकासाठी हा काळ कमी जास्त असू शकतो. मात्र अपेक्षेपेक्षा कमी वेळात वीर्य बाहेर येत असेल तर दोन्ही जोडीदारांची निराशा होऊ शकते.
   शीघ्रपतनाची अनेक कारणे आहेत. सेक्सविषयी भीती, अति आतुरता, कामाचा किंवा इतर प्रकारचा ताण, लैंगिक संबंधाचा आधीचा अनुभव फारसा आनंददायी नसेल तर त्यामुळेही शीघ्रपतन होऊ शकतं. काही वेळा काही शारीरिक आजारही कारणीभूत ठरतात. कधी कधी तर जोडीदाराविषयी आकर्षण आणि प्रेम नसेल तरी शीघ्रपतन होऊ शकतं.
   शीघ्रपतन होऊ नये म्हणून सेक्सबद्दलची चिंता, दडपण दूर करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा उपयोग होईल. तसंच ऑरगॅझम कधी येतो, त्याआधी शरीरात, मनात काय संवेदना निर्माण होतात याचं निरीक्षण करा. त्या क्षणी समागमाचा वेग थोडा मंदावण्याचा प्रयत्न केला तर लवकर वीर्य बाहेर येणार नाही. यासाठी जोडीदाराचं सहकार्य आवश्यक आहे आणि मुख्य म्हणजे एकमेकांशी संवादही तितकाच महत्त्वाचा आहे.
   वैद्यकीय मदत, सेक्सॉलॉजिस्टचा सल्ला आणि काही वेळा औषधांचा उपयोग होऊ शकतो. न घाबरता आणि न लाजता आपली समस्या डॉक्टरांना सांगा. दोन्ही जोडीदारांनी दोषारोप न करता एकमेकांना समजून घेतलं, सेक्स सोडून एरवीही जवळीक वाढवली, धीर दिला तर त्याचा परिणाम निश्चित चांगला होऊ शकेल.
   अधिक माहितीसाठी या वेबसाईटवरील शिघ्रपतान विषयीचा लेख वाचा. खाली लिंक्स दिल्या आहेत.
   http://letstalksexuality.com/premature-ejaculation
   http://letstalksexuality.com/early-ejaculation-start-stop/

 3. Siddhesh says

  माझं वय 24 आहे सतत हस्थमैथुन करून लिंग लहान आणि खूप नरम झालय।।सेक्स करताना लगेच वीर्य बाहेर येते काय करू

  1. I सोच says

   हस्तमैथुनाबद्दल अनेक गैरसमज आहेत त्यापैकी हा एक. हस्तमैथुन ही नैसर्गिक व सुरक्षित लैंगिक क्रिया आहे. हस्तमैथुनाचे कोणतेही तोटे नाहीत. त्यामुळे लिंग लहान होण्याचा किंवा नरम पडण्याचा काहीही संबंध नाही.
   आपण हे समजून घेऊ या की पुरुषांच्या लिंगात ताठरपणा येतो म्हणजे काय होते. लैंगिक उत्तेजना मिळाल्यामुळे मेंदू अशा वेळी रक्ताचा प्रवाह लिंगाच्या दिशेने वाढवतो आणि त्या प्रवाहाच्या दाबामुळे लिंगात ताठरता येते. परंतु या प्रक्रियेवर त्या त्या व्यक्तीचं शारीरिक स्वास्थ्य, मनस्वास्थ्य, वय इत्यादीचा प्रभाव असतो. वयानुसार पुरुषांमध्ये कार्यरत असलेल्या टेस्टेरॉन या विशिष्ट सम्प्रेरकाचे प्रमाण ही कमी होत जाते ज्यामुळे लैंगिक उत्तेजनही कमी होत जाते आणि हे नैसर्गिक किंवा स्वाभाविक आहे.
   शारीरिक आणि मानसिक अस्वास्थ्य असेल, ताणताणाव असतील तर अशा स्थितीतही शरीर संबंधांप्रति अनिछा, अल्पकालीन ताठरता, वीर्य लवकर बाहेर येणे अशा स्थितीचा सामना करावा लागतो. त्यामुळे लिंगाचा ताठरपणा वाढवण्यासाठी लिंगाला होणारा रक्त पुरवठा वाढणं आवश्यक आहे. त्यासाठी पुरेसा पोषक आहार आणि व्यायाम उपयोगी पडू शकतो. लिंगामध्ये ताठरपणा कमी वाटत असेल तर त्यासाठी आहार सुधारायला पाहिजे. चांगला आहार, व्यायाम आणि चिंतामुक्त जीवनशैली शरीराचं रक्ताभिसरण सुधारण्यासाठी आवश्यक आहे. रक्ताभिसरण सुधारलं की लिंगाचा ताठरपणाही वाढतो. वरील उपायांनी फरक न पडल्यास सेक्सॉलॉजिस्टना अवश्य भेटा.
   शीघ्रपतन : स्टार्ट – स्टॉप – स्टार्ट पद्धतीबद्दल जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
   http://letstalksexuality.com/early-ejaculation-start-stop/
   अधिक माहितीसाठी कृपया ‘FAQ – शंका समाधान’ तसेच प्रश्नोत्तरे जरूर वाचा. तुम्हाला शोधणे सोपे जावे यासाठी लिंक देत आहे.
   ‘FAQ – शंका समाधान’: http://letstalksexuality.com/frequently-asked-questions/
   प्रश्नोत्तरे :- http://letstalksexuality.com/question/

 4. Sandeep says

  माझे लघवी करताना विर्य जाते आणि आता ताठरता पण येत नाही काय करावे कुठलि आषध आहे का

 5. Vikas says

  शीघ्रपतन समस्या आहे इच्छा कमी झालीय ताठरता खूपच कमी आहे

  1. I सोच says

   आपल्या प्रश्नाचे उत्तर सोबतच्या लिंक मध्ये आधीच दिलेले आहे.
   http://letstalksexuality.com/question/%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%98%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9B/

   पुढच्या वेळेस इथे प्रश्न न विचारता http://letstalksexuality.com/ask-questions/ इथे विचारावा.

 6. Nikhil Shinde says

  माझं वय 28 आहे, पहिल्यादा सेक्स करत होतो. 3 वर्ष सेक्स केले आहे. आता सेक्स करत असताना लिंग कमी ताठ होते, त्यावर काय उपाय आहे का? सतत हस्तमैथुन करून लिंग लहान आणि खूप नरम झालंंय, सेक्स करताना लगेच वीर्य बाहेर येते काय करू?

  1. lets talk sexuality says

   लिंगाला आधी ताठरपणा यायचा अन आता ताठरपणा येत नसण्यामागे नक्की काय कारण आहे, यासाठी शक्यतो तुम्ही डॉक्टरांना भेटलात तर त्याचा जास्त फायदा होईल.
   तसेच सतत हस्तमैथुन करण्यामुळे लिंंगाला नरमपणा आला, यामागे काहीही संबंध नाहीये. अधिक माहितीसाठी पुढिल लिंक पहा.
   http://letstalksexuality.com/masterbation_safe_pleasurable/
   http://letstalksexuality.com/episode-8-sex-ani-barach-kahi/
   http://letstalksexuality.com/sex-aani-barach-kahi-episode-12-apale-sukh-apalya-hatat/

   लवकर वीर्य बाहेर येते याला शिघ्रपतन म्हणतात, त्यावर काही उपाय ही आहेत, त्या बाबत अधिक माहितीसाठी पुढील लिंंक पहा.
   http://letstalksexuality.com/early-ejaculation-start-stop/

   पुढील वेळेस या ठिकाणी प्रश्न न विचारता http://letstalksexuality.com/ask-questions/ या लिंकवर विचारावा.

 7. Rajat says

  सेक्स करत असताना माझा 2 मिनिटात वीय पडतो या वर काही उपाय आहे का

  1. lets talk sexuality says

   तुम्ही वरील लेख वाचला असालच तेव्हा तुमच्या या समस्येबाबत तुम्हाला नक्की माहिती मिळाली असावी. नसल्यास वरील लेख परत वाचा
   तुम्ही उपायाबाबत विचारले आहे, त्यासाठी पुढील लिंक पहा.
   http://letstalksexuality.com/early-ejaculation-start-stop/

 8. Vikas tathe says

  विर्य गळाल्यावर माझं लिंग ताबडतोब नरम होत

  1. lets talk sexuality says

   मित्रा,
   तुझं आपल्या या बेवसाईटवर स्वागत आहे. आपल्या वेबसाईट वर खूप वेगवेगळया विषयांवर माहिती उपल्ब्ध आहे. आमची विनंंती आहे की, सवडीनूसार सगळी वेबसाईट वाचल्यास तुझ्या 90% प्रश्नांची उत्तरे मिळतील, अन नाही मिळाल्यास आम्ही मदतीला आहोतच.
   तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर असे आहे की, वीर्यपतन झाल्यास लिंगाचा ताठरपणा जाणे ही बाब अगदी सामान्य व नैसर्गिक आहे. अन हे सगळया पुरुषांच्या बाबतीत घडते.
   अधिक माहितीसाठी लिंक पहा
   http://letstalksexuality.com/penis-erection/
   http://letstalksexuality.com/early-ejaculation-start-stop/

   आपल्या सूचना, प्रतिक्रियांचे इथे स्वागतच आहे. पण पुढील वेळी इथे प्रश्न विचारताना इथे न विचारता http://letstalksexuality.com/ask-questions/ या लिंकवर जाऊन प्रश्न विचारा.

 9. Rahul says

  Medical mde je sex power chya medicine miltat. Tyacha khi side effects hoto ka

  1. let's talk sexuality says

   ‘व्हायाग्रा’ व त्याच्यासारखी औषध संभोगाचा कालावधी वाढवण्यासाठी नाहीत, तर लिंगाला उत्तेजना आणण्यासाठी आहेत. जर लैगिक इच्छा होत असेल पण काही कारणांनी लिंगाला ताठरपणा येत नसेल किंवा पुरेसा ताठरपणा येत नसेल, तर ही औषध लिंगाला ताठरपणा आणण्यास मदत करतात. या औषधांनी संभोगाचा कालावधी वाढत नाही. अशा औषधाची गोळी अंदाजे एक तास संभोगाच्या अगोदर घ्यावी लागते. गोळी घेतली की लिंग आपोआप उत्तेजित होत नाही. लैंगिक इच्छा नसेल तर गोळी घेऊनही काहीही फायदा होत नाही. लैंगिक इच्छा जागृत झाली तर या गोळीतील रसायनांमुळे रक्तवाहिन्या रुंदावतात. याच्यामुळे लिंगात जास्त रक्तप्रवाह होतो व लिंगाला ताठरपणा येतो. पण अशा औषधांचे काही दुष्परिणाम आहेत. दृष्टीवर काही काळ परिणाम होणं, शरीराला कंप सुटण, दरदरून घाम येणं, मळमळण इत्यादी. या औषधांनी रक्तवाहिन्यांचा व्यास वाढल्यामुळे रक्तदाब कमी होतो. रक्तदाब खूप कमी झाला तर जिवाला धोका होतो.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.