मतिमंद मुलं-मुली लैंगिक संबंध करू शकतात का ?
एका मतिमंद मुलाच्या वडिलांनी मुलाला लैंगिक भावना व्यक्त करणं शक्य व्हावं यासाठी शरीर विक्रय करणा-या स्त्रियांकडे घेऊन जाण्याचा मार्ग स्वीकारला आहे.
मतिमंद मुलं-मुली लैंगिक संबंध करु शकतात. पण संभोग क्रिया त्यांना जमेलच असं नाही. त्यासाठी त्यांना प्रशिक्षणाची गरज असते. तसंच मतिमंद जोडप्यांनाही लैंगिक संबंध कसे करावेत, लैंगिक आरोग्यासाठी स्वच्छता कशी राखावी याबद्द्लच्या प्रशिक्षणाची गरज असते.
मिठीत घेणं, कुरवाळणं, चुंबन घेणं, एकमेकांचे हात हातात घेणं हेदेखील आनंददायी लैंगिक संबंधच आहेत आणि या क्रिया या मुला-मुलींना करता येतात.
- मतिमंद मुलाला आणि मुलीला एकत्र राहू देणं हा एक चांगला पर्याय आहे. या मुला-मुलींनाही लैंगिक गरज आहे, पण अनेकदा ही मुले सेक्सच्या पातळीपर्यंत पोहचू शकत नाहीत. पण या एकमेकांच्या सहवासातूनही त्यांना त्यांच्या शारीरिक व भावनिक गरज भागवता येतील. महत्वाचं म्हणजे एकत्र जीवन जगायला सोबती मिळेल. आळीपाळीने मुलाचे व मुलीचे दोन्ही पालक त्या दोघांची जबाबदारी घेऊ शकतात. पण एकंदरीत भारतीय संस्कृती, आपली मानसिकता, कौटुंबिक आणि सामाजिक रचना या सर्व गोष्टींचा विचार करता लिव्ह इन रिलेशनशिपच्या वाटेनं जाणारी ही गोष्ट सर्वांच्या पचनी पडेलच असं नाही. पण ज्या पालकांना हा वेगळा पर्याय निवडता येणं शक्य आहे, त्यांनी जरुर हा पर्यायब प्रत्यक्षात उतरवण्याचा विचार करावा. एकदा एकाने पाऊल उचललं की दुस-यानाही स्फूर्ती मिलेळच की.
- मतिमंद मुलं-मुली, समवयस्क मित्र-मैत्रिणी एकत्र भेटतील, एकमेकांशी गप्पा करतील अशा संधी पालक उपलब्ध करून देऊ शकतील. त्यासाठी एकाच भागात राहणा-या मुला-मुलींचा गट करता येईल.
- मुलाला मुलाबद्दल आणि मुलीला मुलीबद्दल शारीरिक, मानसिक आकर्षण वाटणं, शारीरिक संबंध करणं यात वावगं असं काही नाही. भिन्नलिंगी आकर्षण किंवा भिन्नलिंगी शारीरिक संबंधांइतकीच ही एक नैसर्गिक आणि स्वाभाविक गोष्ट आहे. म्हणूनच समलिंगी संबधाचा मोकळेपणाने स्वीकार करणं, मान्यता देणं हा एक निकोप पर्याय उपलब्ध आहे.
- लैंगिक क्रियांसाठी उपयोगी साधनं/खेळणी: सेक्ससाठीची पर्यायी साधन मुला-मुलींना उपलब्ध करून देता येतील का याबाबत विचार करता येईल. उदा. सेक्स डॉल्स, व्हायब्रेटर्स… अशी काही साधनं अलीकडेच बाजारात उपलध झाली आहेत. ही साधनं कशी वापरायची, त्यासाठी काय काळजी घ्यायची हे समजून घेऊन त्याबाबतचे प्रशिक्षण मुला-मुलीना देता येईल.
डिल्डो किंवा व्हायब्रेटर्स यासारख्या काही वस्तू किंवा साधनं बाजारात मिळतात ज्यांचा उपयोग लैंगिक क्रियेचा आनंद मिळविण्यासाठी केला जातो. मुख्यत्वे मानवी लैंगिक अवयवांच्या आकारानुसार बनवली जाणारी, व्हायब्रेट होणारी किंवा न होणारी अशी अनेक साधनं उपलब्ध असतात. यापैकी दोन साधनांबद्द्ल जाणून घेऊयात. पुरुषाच्या लिंगाच्या आकाराची लिंगप्रवेशी साधनं किंवा खेळणी. उदा. गुदद्वारातून करावयाच्या संबंधासाठीची खेळणी, काचेची बनवलेली खेळणी, व्हायब्रेटर)
डिल्डो – योनी किंवा गुद्दद्वाराच्या लैंगिक उद्दिपनासाठी उपयोगात आणले जाणारे डिल्डो हे एक व्हायब्रेट न होणारे साधन आहे. सामान्यपणे सिलिकॉन रबरपासून हे बनवलं जातं. पण धातू किंवा काच अशा वस्तूंपासूनही हे बनवलं जाऊ शकतं. याचा आकार मुख्यत: पुरुषाच्या लिंगासारखा असतो. योनी अथवा गुद प्रवेशाच्या दृष्टीने दोन्ही बाजूंनी टोक असलेले, अधिक लांबी असलेले हे साधन प्रामुख्याने लवचिक असते. जेणेकरून दोन व्यक्ती एकत्रितपणे याचा उपयोग करू शकतील अथवा एका स्त्रीलाही याचा दुहेरी उपयोग करता येईल.
वायब्रेटर – लैंगिक आनंदासाठी स्नायूंना उद्दिपित करण्याच्या दृष्टीने शरीर आणि त्वचेसाठी वापरले जाणारे व्हायब्रेटर हे एक साधन आहे. अपंग व्यक्ती, त्यातही हाताने अधू असलेल्या व्यक्तींसाठी लैंगिक आनंद आणि समाधान मिळविण्याच्या दृष्टीने व्हायब्रेटर हे साधन कदाचित एकमेव पर्याय असू शकतं.
अधिक माहितीसाठी लेखाच्या खाली लिंक दिल्या आहेत नक्की पहा.
- काही पालकांनी निवडलेले पर्याय:
- स्वत:च्या मतिमंद मुलाच्या लैंगिक भावना शमवता याव्यात म्हणून त्याची आईच त्याला हस्तमैथुन करुन देण्यात मदत करते. घराबाहेर इतरांबरोबर चुकीच्या पध्दतीने व्यक्त होण्यापेक्षा हा पर्याय त्यांना अधिक सोयीस्कर वाटतो. तसंच लैंगिक भावना शमवण्यासाठी हस्तमैथुन हा कायम एकचा चांगला पर्याय आहे.
- एका मतिमंद मुलाच्या वडिलांनी मुलाला लैंगिक भावना व्यक्त करणं शक्य व्हावं यासाठी शरीर विक्रय करणा-या स्त्रियांकडे घेऊन जाण्याचा मार्ग स्वीकारला आहे. ते दर १५ दिवसांनी त्याला त्याठिकाणी घेऊन जातात आणि आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक काळजीही घेतात.
साधारणपणे लग्नानंतर मूल हवं असणं ही सर्वांची अपेक्षा असते. पण मतिमंद जोडपं असेल तर काही वेळेला मूल नको अशी पालकांची भूमिका असते. पण काही वेळेला त्यांना एखादं मूल होऊ घ्यावं असंही पालकांना वाटत असतं. गर्भधारणा टाळ्ण्यासाठी मुलाची किंवा मुलीची नसबंदीची शस्त्रक्रिया करून घेता येईल किंवा गर्भरोधक साधनांचा वापर करता येईल. जेणेकरुन नको असणा-या मुलाचा जन्म वा गर्भपात या गोष्टी घडणार नाहीत.
गर्भाशय काढल्यानं नको असलेली गर्भधारणा टाळता येते. पण मुलगी मतिमंद असली तरी पालकांनी एक व्यक्ती म्हणून तिला असणारे लैंगिक हक्क, अधिकार, तिचा आत्मसन्मान, शरीर आणि मनाचा आदर आणि त्याविषयीचे हक्क जपले जाणं, आवड- निवड विचारात घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यातही नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी मुलीची नसबंदीची शस्त्रक्रिया करुन घेणं अधिक उचित ठरु शकतं. पाळीच्या काळातील स्वच्छता, जंतुसंसर्गाचा धोका या कारणांसाठीही पालक मुलीचे गर्भाशय काढण्याचे ऑपरेशन करण्याचा विचार करत असतात. मतिमंदत्वाच्या विभागणीनुसार काही मुलींना पाळीच्या काळात कशी स्वच्छता ठेवायची, याचे प्रशिक्षण देता येते. सर्वच मुलीच्या बाबतीत असं ऑपरेशन करण्याचा निर्णय घेण्याची आवश्यकता नसते. पण हे निर्णय आपण किती विचारपूर्वक घेतो हे महत्वाचं आहे. शिवाय अशावेळी तज्ञांचे मार्गदर्शन जरुर घ्यावे.
संदर्भ : वरील संपादित लेख तथापि ट्रस्टच्या ‘शरीर साक्षरता सर्वांसाठी ‘ या मतिमंद मुला – मुलींच्या पालक व शिक्षकांसाठी लिहिलेल्या पुस्तकातील आहे.
या लेखाचा स्त्रोत काय आहे?
नजरचुकीने राहिला होता….लेखाच्या खाली दिला आहे.
धन्यवाद