सेक्स आणि बरंच काही सिझन २ : एपिसोड ८ – अपंग व्यक्ती अन त्यांची लैंगिकता – उत्तरार्ध

2,711

मागील भागात आपण ‘अपंगत्व आणि शरीर साक्षरता व लैंगिकता’ या विषयाला घेऊन तथापि ट्रस्ट सोबत   मागील दोन वर्षापासून काम करणा-या सुषमा खराडे यांच्यासोबत गप्पा मारल्या. याच विषयाचा हा दुसरा भाग आज घेऊन आलेलो आहोत.

आजच्या भागात आपण बौद्धिक अपंगत्व असणा-या मुलांच्या पालकांना काय काय चिंता सतावत असतात, त्यासाठी काय काय प्रयोग केले गेले आहेत हे ऐकणार आहोत. आपल्या या मित्र मैत्रीणींने लग्न करावं की नाही? त्यामध्ये काय जबाबदा-या असू शकतात? तसेच मुलींच्या बाबतीत विचार करताना पाळी, स्वच्छता, लैंगिक शोषण व त्यासोबत येणारी पालकांची काळजी अन त्यातुन मुलींच्या गर्भाशय काढण्याबाबत काय भूमिका असावी अशा निरनिराळ्या विषयांवर चर्चा करण्यात आलेली आहे.

आपल्या बेवसाईटच्या तरुण वाचकांना जर या कामात जोडून घ्यायचं असेल तर आम्ही एक नवीन उपक्रम हाती घेत आहोत. तो काय आहे याची देखील चर्चा या पॉडकास्ट मध्ये केलेली आहे.

चला तर ऐकूया निहार अन गौरी सोबत ‘अपंगत्व आणि लैंगिकता’ या विषयावरील हा दुसरा भाग.
आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की लिहा.

आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की लिहा.
आपले सर्व पॉडकास्ट जसे letstalksexuality.com वेबसाईट वर उपलब्ध आहेत तसेच ते Sex Aani Barach Kahi या यूट्यूब चॅनलवरही आहेत. तेथे तुम्ही जाऊन सबस्क्राईब करा, लाईक करा, आपल्या मित्रांना पाठवा. तुमच्या मनातील याविषयीचे विचार, शंका आम्हाला कळवा…

तेव्हा भेटू या पुढच्या भागात नवीन विषयाला घेऊन तोपर्यंत ऐकायला विसरू नका.. सेक्स आणि बरंच काही सिझन २.

Comments are closed.