सध्याच्या काळात लग्न हा समागम करण्यासाठीचा, शरीर संबंध ठेवण्यासाठीचा समाजमान्य मार्ग समजला जातो. मात्र जर दोघा जोडीदारांची संमती असेल, आणि एकमेकांवर विश्वास असेल तर लग्नाआधी सेक्स करण्यात वाईट काही नाही. मात्र ही एक जबाबदार क्रिया आहे. त्याच्या परिणामांची माहिती आधीच असणं आवश्यक आहे.
लग्न हा एक सामाजिक रिवाज आहे. आजही अनेक समुदायांमध्ये स्त्री पुरुष एकत्र येतात, संसार करतात, मुलं जन्माला घालतात आणि हाताशी पुरेसा पैसा आला की मग लग्नाचा कार्यक्रम करतात. त्यामुळे लग्नाआधी का नंतर यापेक्षाही दोघांची इच्छा, संमती आणि जबाबदारीची जाणीव या बाबी जास्त महत्त्वाच्या आहेत.
म्हणूनच, चिल, टेक इट इझी…
प्रश्न लग्नाआधी किंवा लग्नानंतर हा नाही.
तर,
संमती, विश्वासाचा आहे…
याविषयी बोलणारा ‘तथापि’च्या पुढाकाराने ‘आयसोच’ प्रस्तुत ‘Before or After’ हा व्हीडीओ अवश्य पहा. तुम्हाला नक्की आवडेल.
Lagnaaadhi sex kelele navrayla samjte ka