सेक्स आणि बरंच काही – एपिसोड २: सेक्स करू का नको ?

6 2,388

‘सेक्स आणि बरंच काही’ पॉडकास्ट ऐकताय ना? तुमच्या साठी दुसरा एपिसोड घेऊन येत आहे ‘सेक्स करू का नको?’

सेक्स,लैंगिक संबंध किवा शरीर संबंध करावा की नको? सेक्सविषयी आपल्या सगळ्यांच्या मनात वेगवेगळ्या कल्पना असतात. कुणाला सेक्स ही प्रेमाची पावती वाटते, कुणाला भावनिक गुंतवणूक वाटते, कुणाला ही फक्त शारीरिक गरज वाटते तर कुणाला टाइमपास.

सेक्सविषयी अशा अनेक भावना आपल्या मनात असतात. सेक्स कुणासोबत, कधी, कुठल्या वयात, कसं आणि करावं का नाही असे अनेक प्रश्न तुमच्या मनात असतील. सेक्स नाहीच केलं तर असंही कुणाला वाटत असेल.

याविषयीच्या मनमोकळ्या गप्पा ऐकण्यासाठी ‘सेक्स करू का नको ?’ हा पॉडकास्ट अवश्य ऐका… आणि हो, ‘सेक्स आणि बरंच काही’ हा पॉडकास्ट ऐकत रहा आणि तुमच्या प्रतिक्रिया/सूचना नक्की कळवा.

 

6 Comments
 1. gopi says

  खूप छान वाटलं , ऐकून ।
  तो संवाद ऐकून असा वाटलं की मी आणि माझी मैत्रिनाच बोलत आहोत की काय !
  दोघांचा आवाज ही खूप छान आहे।

  1. I सोच says

   प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभार… ‘सेक्स आणि बरंच काही’ पॉडकास्ट ऐकत रहा. दर सोमवारी एक नवीन एपिसोड प्रकाशित केला जाईल. तुमच्या मित्र मैत्रिणींना देखील सुचवा.

 2. Navnath says

  सर खूप महत्वाची माहीती खूप छान प्रकारे पोहचवताय तुम्ही.
  Keep it up sir

  1. let's talk sexuality says

   खूप धन्यवाद !!

 3. tejas says

  महिला जेव्हा पहिल्यांदा पुरुषांचे लिंग पाहतात तेव्हा त्याना काय वाटते

  1. let's talk sexuality says

   हा फार व्यक्तिनिष्ठ प्रश्न आहे, जो प्रत्येकाच्या दृष्टीने वेगवेगळा असू शकतो. व्यक्तिला त्याच्या आयुष्यात आलेल्या अनुभवावर हा आधारित आहे. म्हणजेच प्रत्येक महिलेला येणारा अनुभव हा निरनिराळा असणार आहे. एखाद्या महिलेला फार उत्सुकता असू शकते तर एखाद्यास काही चुकिच्या समजुती मनात असल्यास त्याची भितीही वाटू शकते. थोडक्यात त्या महिलेची किंवा व्यक्तीची प्रतिक्रिया हि पूर्णपणे त्या व्यक्तीच्या तेव्हाच्या मानसिकतेवर अवलंबून आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.