स्पेस प्लीज !!!

0 1,643

नात्यांमधील प्रेम आणि दबाव, नियंत्रण यामध्ये खूपच अंधुक लाईन असते. ही लाईन अनेकदा इतकी अस्पष्ट असते की प्रेम आणि दबाव, नियंत्रण यातला फरक लक्षात येत नाही.  प्रेमाच्या किंवा कोणत्याही जवळच्या नात्यांमध्ये मालकीच्या भावनेचा शिरकाव कधी  होतो ते कळतंच नाही. आपल्याला प्रिय असणारी व्यक्ती ही आपल्या हक्काची, मालकीची असते असं कळत नकळत आपल्या मनावर बिंबवलं जात असतं. सिनेमांमधून, प्रेमकथांमधून, मालिकांमधून अशाच प्रकारे प्रेमसंबंध दाखवले जातात. प्रेमाच्या नात्यामध्ये एकमेकांवर हक्क असण्याची संकल्पना रंगवली जाते आणि त्यातून एकमेकांवर हक्क आणि त्यातून नियंत्रण येतं.

नात्यामध्ये जर एखाद्याला स्वतःच्या मर्जीप्रमाणे राहता येत नसेल, वागता येत नसेल, मोकळेपणाने हिंडता फिरता येत नसेल, इतरांशी नाती प्रस्थापित करता येत नसतील तर ते नियंत्रण आहे आणि आपल्या मोकळेपणावर किंवा स्वातंत्र्यावर गदा आणते हे समजून घ्यायला पाहिजे . असं नियंत्रण कोणत्याही नात्यासाठी घातकच असतं.

‘नात्यातील दबाव आणि नियंत्रण’ याविषयी बोलणारा ‘तथापि’च्या पुढाकाराने ‘आयसोच’ प्रस्तुत ‘स्पेस प्लीज’ हा व्हीडीओ अवश्य पहा.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.