योनीमार्गात जंतुसंसर्ग का होतो?

योनी हा शरीराचा अविभाज्य भाग आहे. योनीला इंग्रजीत वजायना (Vagina) म्हणतात. शरीराच्या कोणत्याही क्रियेत बिघाड झाला तर त्याचे परिणाम सर्व अवयवात दिसून येतात. काही कारणांमुळे प्रतिकारशक्ती कमी झाल्यास त्याचे परिणाम योनीमार्गातील संतुलन बिघडण्यातही होऊ शकतो. योनमार्गात खाज येणे, आग होणे, अंगावरून जास्त जाणे, अंगावरून जाणाऱ्या म्हणजेच योनीमार्गातून येणाऱ्या स्रावाचा रंग, वास बदलणं, त्या स्रावाचं प्रमाण वाढणे, कंबर दुखणे, ओटीपोटात दुखणे अशा अनेक प्रकारे आपल्याला योनीमार्गात जंतुसंसर्ग झाल्याची जाणीव होते. योनीमार्गातील जंतुसंसर्ग केवळ लैंगिक संबंधांमधून होत नाहीत. त्याला इतरही काही कारणं आहेत.

योनीत जंतुसंसर्ग होण्याची शक्यता खालील परिस्थितीत जास्त असते.

 • शरीरात कुठेही जंतुसंसर्ग असल्यास
 • आहार व्यवस्थित नसल्यास
 • झोप कमी लागणे/नीट न लागणे
 • जंतुप्रतिबंधक (antibiotics) औषधं घेत असल्यास
 • मानसिक ताण असेल तर
 • लैंगिक संबंधांचं प्रमाण एकदम वाढल्यास
 • रक्तपांढरी
 • मासिक पाळीच्या वेळेस स्वच्छता न पाळल्यास

योनीत जंतुसंसर्ग होऊ नये म्हणून पुढील काळजी घ्या.

 • मासिक पाळीच्या वेळेस स्वच्छ कापड वापरा.
 • पॅड वापरत असल्यास ते दर 3-4 तासांनी बदला.
 • शौचाची जागा धुताना शौचाचे कण योनीमार्गात जाणार नाहीत याची काळजी घ्या. आधी लघवीची जागा धुवा त्यानंतर शौचाची जागा धुवा.
 • आतले कपडे रोजच्या रोज धुऊन वापरा.
 • मानसिक ताण कमी करण्यासाठी शवासन किंवा दीर्घ श्वसनासारखे व्यायाम करा.
 • संतुलित आहार घ्या.

योनीच्या किंवा जननेंद्रियांच्या आजारांबद्दल बोलण्याची लाज वाटल्यामुळे त्यावर उपचार घेतले जात नाहीत. पण लाज वाटून, लपवून हे आजार बर होणार नाहीत. शरीराच्या इतर आजारांप्रमाणेच हेही आजार आहेत. त्यावर उपचार होऊ शकतात. त्यामुळे न घाबरता आपल्या त्रासाविषयी बोला आणि मदत घ्या.

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल…

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल...

4 Responses

 1. Sujata shinde says:

  Lagn zale pahilya mahinyatch unhali lagali dr. Sangitle urin infection zale mhnun pn aata satat 3mahinyatch tisari vel zali unhali lagaliy ky karave kahi suchena

  • पुन्हा डॉक्टरांना भेटा अन तुमची समस्या सांगा. हे असं का होत आहे यामागचे कारण शोधण जास्त गरजेचे आहे. कारण सापडले की योग्य उपचारही होतील. अंगावर काढू नका .

 2. Ajay says:

  Nice information

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copy link
Powered by Social Snap