लैंगिक उपकरणं (Sex Toys) – भाग २

लैंगिक उपकरणांची माहिती घेताना मागील भागात लैंगिक शिक्षणासाठी वापरली जाणारी, वैद्यकीयदृष्ट्या वापरली जाणारी व लैंगिक सुखासाठी वापरली जाणारी लैंगिक उपकरणे यांची माहिती घेतली. या भागात लैंगिक उपकरणांबाबत समज – गैरसमज, विकत घेताना काय पाहावं, कुठले चांगले बॅंड आहेत, अन वापरताना काय काळजी घ्यावी इत्यादी बाबत माहिती घेणार आहोत. महत्वाचे म्हणजे लैंगिक उपकरणे व भारतीय कायदा याबाबतही जाणून घेणार आहोत.

लैंगिक उपकरणांबाबत समज – गैरसमज  

 १.  सेक्स टॉईज सेफ नाहीत

– जर तुम्ही त्याची व्यवस्थित निगा राखत असाल तर सेक्स टॉईज वापरणं हे पूर्णतः सेफ आहे. योग्य डॉक्टरांचा सल्ला घेऊन वापरले तर सेक्स-टॉईज आणखीन सेफ असतील.

२.  सेक्स-टॉईज हे नैसर्गिक नाहीत

– नैसर्गिक तर कपडेही नाहीत, निरोध देखील नाहीत, मग ते सगळं आपण बंद करणार का? लैंगिक सुख जर नैसर्गिक आहे, तर मग हे सुख मिळवण्यासाठी सुरक्षित साधनांचा वापर करणं काही गैर नाही. . प्रश्न एवढाच असायला हवा, की त्यामुळे आपल्याला वा इतरांना काही त्रास तर होत नाही ना !

३. सेक्स-टॉईज आणि खरा-खुरा पार्टनर, याची तुलना होऊ शकत नाही. खेळणी  ही अतृप्त लोकांसाठी असतात.

– हे खरं आहे एका परीने. सेक्स-टॉईज हे निव्वळ सुखासाठी वापरली जातात, तसेच सेक्स-टॉईज हे  ‘बेडरूमधलं’ सुख वाढवणारं देखील असतात.

हा गैरसमज आहे की टॉईज फक्त पार्टनर नसलेली वा अतृप्त लोकंच वापरतात. कित्येक टॉईज हे कपल्ससाठी असतात, दोघंही ते वापरतात आणि सेक्स-टॉईज त्यांना जास्त आनंदही देतात. जास्त आनंद यासाठी की, एकतर सेक्स-टॉईज थकत नाहीत  आणि दुसरं म्हणजे ज्या महिला मल्टी-ऑरगॅजमचा अनुभव घेऊ शकतात त्यांच्यासाठी अशी खेळणी अधिक उपयोगी ठरू शकतात. अशा साधनांचा उपयोग जेंव्हा जोडीदार एकमेकांसोबत करतात तेंव्हा जो Receiver आहे, त्याला त्याचा पूर्ण आनंद घेता येतो.

सेक्समध्ये काय महत्त्वाचं असतं? तर सुख! आणि ते सुख प्रत्येकजण आपापल्या परिने मिळवत असतो. सेक्स-टॉईज तेच सुख वाढवण्याचं काम करतात.

४. उद्या त्याचं व्यसन लागलं तर ? पार्टनरबरोबर सेक्स नकोसा वाटला तर ?

– सेक्स-टॉईज तुम्हाला खराखुरा शारिरीक स्पर्श, प्रेम, साथ देत नाहीत. लैंगिक कृतींचं व्यसन लागणे ही एक निराळीच गोष्ट आहे, ज्यावर चर्चा व्हायला हवी. आपल्याकडे कुठल्याही गोष्टीला व्यसन संबोधलं जातं आणि त्याचा बाऊ केला जातो. उदा. हस्तमैथुनाचे व्यसन तर नाही ना अशा शंका घेऊन अनेक मुलं स्वतःला विनाकारण छळत असतात. दुसरे म्हणजे जोडीदार जेंव्हा नकोसा वाटतो तेंव्हा त्याला अनेक कारण असू शकतात. नातेसंबंधांमध्ये तणाव निर्माण होऊन दुरावा तयार होणे. अशाच काही कारणांकडे दुर्लक्ष करून त्यांचा ब्लेम सेक्स टॉईज वर टाकणे योग्य नाही. .

५.  सेक्स टॉईज वापरणं याचा अर्थ जोडीदारामध्ये काही तरी कमी आहे असा होतो.

– टॉईज वापरताय म्हणून तुमच्या पार्टनरमध्ये दोष आहे किंवा तुम्ही सेक्स ऍडिक्ट आहात, हा चुकीचा विचार आहे. जर त्या सुख मिळवण्यात कोणाचं नुकसान नसेल, तर त्या सुखाला नेहमीच प्राधान्य द्यायला हवे.

 

सेक्स टॉईज बाळगताना घ्यावयाची काळजी 

१. बायकासांठी पहिल्यांदा सेक्स टॉईज निवडणं हे कमालीचं अवघड आहे. कारण जोपर्यंत ते वापरलं जात नाही, तोपर्यंत आपल्याला सेक्स-टॉईजमध्ये नक्की काय आवडतं हे कळत नाही. सेक्स टॉईजमध्ये बरेच प्रकार असतात. त्यातही त्याचा आकार कसा असावा हेही प्रत्येकीच्या योनीच्या रचनेवरून ठरत असतं. हे सगळं त्या त्या बायकांच्या नर्व्ह एंडिंग्सवरून ठरतं. आपल्याला कुठे-कसं प्लेजर जास्त मिळतं, हे त्या बाईला माहित असेल तर टॉईज निवडणं सोपं पडतं.

२. कुठल्या मटेरिअल्सचं वापरावं हा नेहमी महत्त्वाचा प्रश्न असतो. प्लास्टिक, सिलिकॉन, रबर, मेटल वेगैरे बरेच प्रकार मिळतात. यात सिलिकॉन आणि मेटल जास्त सेफ वाटतात. पण मेटल फारच महाग असल्यामुळे, सिलीकॉनला जास्त प्रिफरंन्स असतो. यात Porous मटेरिअल्सचं काही वापरू नये, कारण ते व्यवस्थित स्वच्छ होत नाही. Jelly-rubber मटेरिअल्सचे टॉईज शक्यतो टाळावेतच. अगदी तेच आवडले तर मग स्वच्छतेसाठी जास्त काळजी घ्यावी.

३. कुठलंही स्वस्तातलं, चायनीज मॉडेल वगैरे चुकूनही घेऊ नये. चांगल्या ब्रॅन्डचंच घ्यायला हवं. ३००० ते ५००० रुपयांत खूप चांगल्या ब्रँडची विश्वासू टॉईज मिळतात. त्यात ‘We Vibe’, ‘Jimmy Jane’, ‘Fun Factory’, ‘California-exotica’ हे चांगले ब्रॅण्ड्स आहेत.

४. सेक्स-टॉईज साठी चांगले Water Based Lubes वापरणं गरजेचं आहे.

५. सर्वात मोठी जबाबदारी म्हणजे स्वछता. ज्याला स्वच्छतेचा फारच बाऊ असेल, त्याने टॉईज निरोध लावून वापरावेत. वापरुन झाल्यानंतर स्वच्छ ‘Antibacterial Cleaner’ ने साफ करावं, गरम-कोमट पाण्याने धुवून काढावं… आणि स्वच्छ करूनच वापरावं. जसं आपण एकाचं निरोध दुसऱ्याला वापरत नाही, तसं एकाचं टॉय दुसऱ्याने वापरू नये. चांगले Antibacterial Cleaner येतात, ते टॉईज बरोबरच घ्यावेत.

 

सेक्स-टॉईज ही देणगी? कसं काय?

 चांगल्या आरोग्यासाठी देखील लैंगिक गरजा भागवता येणं फार गरजेचं आहे. विशेषत: महिलांमध्ये, लैंगिक सुख न मिळाल्याने बरेच ताण, चिंता, निद्रानाश अशा समस्या उद्भवू शकतात. लक्ष केंद्रित होत नाही, लक्ष लागत नाही, असे बरेच प्रकार-आजार बळावू शकतात.

Anorgasmia, यात बायकांना किंवा पुरुषांना साधा एक ऑरगॅजम मिळवताना नाकी-नऊ येतात. तिथे जोडीदार थकतो तिथे त्यांचा सेक्स सुरूही झालेला नसतो. मग अशा ठिकाणी सेक्स-टॉईज ही देणगी होते.

सर्वसामान्यांसारख्या मतिमंदत्व असणा-या व्यक्तिंच्याही लैंगिक भावना असतात हे अजून समाजात मान्य होताना दिसत नाही. अशा व्यक्तींच्या लैंगिक अभिव्यक्तीसाठी लैंगिक उपकरणे ही खूपच लाभदायक ठरतात.

 

कायदा व अश्लील वाङ्मय/लैंगिक उपकरणे/साधने

आपल्या देशात लैंगिक खेळणी, उपकरण तयार करण्यास, विकण्यास कायद्याने मंजुरी नाही. ही सर्व खेळणी अश्लील वाङ्मयाखाली मोडत असल्यामुळे त्यांची निर्मिती करण भा.दं.सं. २९२ खाली गुन्हा आहे. त्यामुळे अशी उपकरणे दुकानात विकत मिळत नाहीत, पण सध्या ऑनलाईन पद्धतीने लोक मागवत असतात किंवा बाहेर देशातून मित्रांकरवीही मागवताना दिसतात.

(याला अपवाद – जर एखादं उपकरण वैद्यकीय कारणासाठी तयार केलं तर त्याला मान्यता आहे.)

  • – अश्लील वाङ्मय तयार करणं, विकणं भा.दं.सं. २९२ कलमानुसार गुन्हा आहे.
  • – २० वर्षांखालील मुला/मुलींना अश्लील वाङ्मय विकणं भा.दं.सं. २९३ नुसार गुन्हा आहे.
  • – एखात्या व्यक्तीने अश्लील वाङ्मय खाजगीत बघणं, बाळगणे गुन्हा नाही. पण ते दुस-यांना दाखवणं, देणं, विकणं, पाठवणं गुन्हा आहे.

अश्लीलता ही सब्जेक्टिव्ह’ आहे. कोणाला कशात सौंदर्य वाटेल व कोणाला कशात अश्लीलता दिसेल सांगता येत नाही. एखाद्याला मायकेल अँजेलोने घडवलेला ‘डेव्हिड’ चा नग्न पुतळा सुंदर वाटेल, तर दुस-या एखात्याला तोच पुतळा अश्लील वाटेल, म्हणून प्रश्न पडतो की अश्लील काय? नग्नता अश्लील आहे का? यावर दोन मतं असू शकतात. अश्लीलतेची व्याख्या बदलत असते. म्हणून भा.दं.सं. २९२ कलमाचा वापर अनेकवेळा वादग्रस्त ठरतो. कोणतं शिल्प कला म्हणून सुंदर दिसतं व कोणतं शिल्प लैगिक उत्तेजना हे आपण सांगू शकत नाही.

काही वर्षांपूर्वी एका संग्रहालयात एक लैंगिक चित्र लावले गेलं. ते एका वर्तमानपत्राने प्रसिद्ध केलं. वर्तमानपत्रावर जेव्हा २९२ चा दावा लावला गेला तेव्हा कोर्टानं सांगितलं, की संग्रहालयामध्ये येणारे कला बघण्यासाठी येतात, त्यांची एक विशिष्ट मानसिकता असते. जेव्हा तेच चित्र वर्तमानपत्रात येत तेव्हा ते कोणाच्याही हाताला लागतं. ते सर्व प्रकारचे वाचक बघतात आणि म्हणून छापायच्या अगोदर त्याचा बघणा-यावर काय परिणाम होऊ शकतो, याचा विचार एडिटरनी करायला हवा, वर्तमानपत्रानं माफी मागितली व केस निकालात निघाली.

 

संदर्भ :

लैंगिक खेळणी, उपकरण तयार करण्यास, विकण्यास कायद्याने मान्यता द्यावी का? जर मान्यता द्यावी असे वाटत असेल तर त्यात काय बाबी पाळल्या जाव्यात? तुमचे काय मत आहे?

खाली आपल्या कमेंट लिहून आम्हाला नक्की कळवा. 

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल…

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल...

No Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी

Copy link
Powered by Social Snap