मृदू व्रण (शांक्रॉईड)

1,842

मृदू व्रण (शांक्रॉईड)

या रोगात जननेंद्रियावर दुखणारा पण मऊ व्रण तयार होतो म्हणून त्याला ‘दुखरा व्रण’ किंवा मृदू व्रण असे म्हणतात. हा आजार जीवाणूंमुळे होतो. हा व्रण पुरुषांमध्ये शिश्नाच्या टोकावर किंवा त्वचेखाली, तर स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या तोंडावर किंवा योनिमार्गात कोठेही  येऊ शकतो. जंतुलागण झाल्यावर चार ते सात दिवसात व्रण येतात.

लक्षणं

  • शिश्नाच्या टोकावर किंवा त्वचेखाली लालसर, मांसल व्रण. असे एकाहून अधिक व्रण आढळतात. जिथे व्रण असेल तिथे दुखते आणि धक्का लागल्यास रक्तस्राव होऊ शकतो.
  • सिफिलिसप्रमाणे या व्रणाचा तळ घट्ट नसतो तर मऊ असतो.
  • जांघेमध्ये ठणकणारे अवधाण येते. त्यात पू होऊन नंतर त्वचेवाटे तो बाहेर पडतो व ही जखम बरेच दिवस राहते.

योग्यवेळी उपचार न झाल्यास जननेंद्रियावरची त्वचा आक्रसते व लघवीचे छिद्र बारीक होते. योग्य उपचाराने आजार पूर्ण बरा होतो.

माहितीसाठी – साभार – www.arogyavidya.net, www.lovematters.in

Comments are closed.