योनीमार्गाचे स्नायू बाळंतपण, सिझेरियन शस्त्रक्रिया, वारंवारचे गर्भपात किंवा कष्टाच्या कामामुळे सैल पडतात. केगेल व्यायामामुळे स्नायूंमध्ये घट्टपणा यायला मदत होते. लैंगिक संबंधांमध्ये स्त्रियांना लैंगिक आनंदही मिळू शकतो. खबरदारी हीच की योग्य ते स्नायू ओळखा. पोटाचे स्नायू आत ओढून उपयोग नाही.
डॉ. केगेल यांनी १९४८ मध्ये या व्यायामांबद्दल पहिल्यांदा माहिती द्यायला सुरुवात केली. त्यामुळे त्यांच्या नावावरूनच हे व्यायाम प्रकार ओळखले जातात.
केगेल व्यायाम करण्याची पद्धत –
सुरुवातीला कोणते स्नायू रोखून ठेवायचे हे समजून घेणं गरजेचं आहे. त्यासाठी लघवी करत असताना ती मध्येच थांबवा, रोखून धरा. त्यासाठी ज्या स्नायूंचा वापर होतो ते स्नायू केगेल व्यायामाशी संबंधित आहेत.
व्यायामाचे टप्पे-
- योग्य स्नायू ओळखा
- पाच सेकंद स्नायू आतमध्ये रोखून धरा. मग पाच सेकंद स्नायू शिथिल करा. हीच कृती चार-पाच वेळा करा.
- एकदा हे करायला जमलं की स्नायू आत ओढून घेण्याचा काळ 10-12 सेकंदांपर्यंत वाढवा.
- स्नायू आत ओढून घेताना त्यावर सगळं लक्ष केंद्रित केल्याने फायदा होतो. पोटाचे किंवा नितंबाचे स्नायू आत ओढू नका. फक्त लघवी, योनीमार्ग आणि गुदद्वाराचे स्नायू ओढून धरा.
- एका वेळी 10 आकुंचन-प्रसरण असं दिवसातून किमान तीन वेळा करा.
केगेल व्यायाम बसून, आडवं पडून, झोपून, कुशीवर झोपून कसेही करता येतात. इतर काम करत असतानाही ते करता येतात. गरोदर स्त्रिया बाळंतपणाच्या आधी आणि बाळंतपण झाल्यानंतर हे व्यायाम करू शकतात.
ज्यांना नकळत लघवी होण्याचा किंवा शिंक, खोकला आल्यावर काही प्रमाणात लघवी होण्याचा त्रास होतो त्यांच्यासाठी हा चांगला व्यायाम आहे.
PC :
- https://www.kegel8.co.uk/articles/pelvic-floor-exercise/how-to-do-kegel-exercises.html
- https://www.healthxchange.sg/women/urology/what-are-kegel-exercises
No Responses