आपण काय करतोय ते पूर्ण माहित असताना, आपण जे काय करतोय त्याचे परिणाम काय होऊ शकतात ते माहित असताना दिलेली म्हणजे माहितीपूर्ण संमती (इन्फॉर्म्ड कन्सेन्ट). दबावाखाली, धमकी देऊन, इमोशनल ब्लॅकमेल करून (उदा. तू माझ्याबरोबर संबंध ठेवले नाहीस तर तुझं माझ्यावर प्रेम नाही) मिळवलेली परवानगी म्हणजे पूर्ण, स्वतंत्रपणे दिलेली संमती नाही. लैंगिक संबंधांच्या संदर्भात संमतीचा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. लैंगिक संबंधांसाठी संमती असणं, ती स्पष्ट असणं आणि नसेल तर ती नाही हे स्पष्टपणे सांगणं अवघड आहे पण गरजेचं आहे. तुम्ही एखाद्या मुलावर किंवा मुलीवर प्रेम करता म्हणजे त्याचा तुमच्या शरीरावर हक्क नाही हे लक्षात ठेवा. तुमची इच्छा आणि संमती असेल तर असे संबंध आनंदंदायी होऊ शकतात.
लैंगिक संबंधांशिवाय इतर काही कृतींसाठीही संमती आवश्यक असते. तुमचे फोटो, व्हिडिओ काढणं किंवा ते इंटरनेटवर अपलोड करणं, तुमच्या फोटोचा वापर छापील किंवा इतर माध्यमात करणं यासाठीदेखील तुमची संमती आवश्यक असते.
रक्ताची तपासणी, गर्भपातासारखी शस्त्रक्रिया, गर्भनिरोधक बसवणं, औषधाच्या शरीरावरील चाचण्या अशा इतर गोष्टीदेखील तुमच्या संमतीशिवाय होऊ शकत नाहीत.
2 Responses
सर माझ लिंगावरच टोक मागे सरकवले तिथे हात लावला तर आग का होते ,संभोग करतेवेळी शिस्नमुंड उघडे करुन मला संभाेग करता येईना, झाकुन असताना काहीही ञास होत नाही
डॉक्टरांना भेटा..
नक्की काय कारण आहे हे शोधावं लागेल. डॉक्टर निरिक्षण करुन मदत करतील.