आपल्या वेबसाईटवर अंगावरून पाणी जाणे (White discharge) याविषयी अनेक प्रश्न विचारले गेले आहेत. कोणत्या परिस्थितीमध्ये योनीतून पांढरे पाणी जाते हे समजून घेणे आवश्यक आहे. म्हणूनच योनीतून होणाऱ्या पांढऱ्या स्रावाविषयी थोडक्यात माहिती लिहित आहे याचा तुम्हाला निश्चितच फायदा होईल.
स्त्रीच्या योनीतून स्राव होणे याला अंगावरून पांढरे पाणी जाणे असेही म्हंटले जाते. अंगावरून जाणारा पांढरा स्राव याविषयी माहिती असेल तर हा स्राव नैसर्गिक आहे की, आजारामुळे त्यात काही बदल झाला आहे हे समजून घेता येईल.
सगळ्याच स्त्रियांना योनीमार्गात ओलासर पणा जाणवतो. योनीतून झिरपणाऱ्या पाण्याला योनिस्राव किंवा पांढरे पाणी असे म्हणतात. या पाण्यामुळे योनी स्वच्छ राहते. स्वाभाविक ओल किंवा पांढरे पाणी आतील कपडे खराब करत नाही. आतील कपडे खराब होतील इतक्या प्रमाणात जर पांढरे पाणी जात असेल तर मात्र चिंता करण्यासारखी गोष्ट असते.
काही विशिष्ट परिस्थितीमध्ये नैसर्गिकरीत्या योनीतून थोडे जास्त पांढरे पाणी जाते. बीज बिजकोषातून बाहेर पडल्यावर (२४ ते २८ तास पाळीच्या मध्यावर), गरोदरपणी आणि लैंगिक संबंधाच्या वेळेस योनीतून पांढरे पाणी जास्त प्रमाणात जाऊन कपडे खराब होऊ शकतात. हे नैसर्गिक आहे यात चिंता करण्याचे काहीही कारण नाही. मानसिक त्रास, रक्तपांढरी (रक्त कमी झाल्यामुळे) , झोप येत नसल्यास, असंतुलित आहार यामुळे सुद्धा अंगावरून नेहमीपेक्षा थोडे जास्त पांढरे पाणी जाऊ शकते.
काही वेळा मात्र अति प्रमाणात अंगावरून पांढरे जाते. यामुळे आतील आणि काही वेळा बाहेरचे सुद्धा कपडे ओले होतात. जंतूलागण झाल्याने असे आजार होऊ शकतात. अंगावरून नैसर्गिकरीत्या जाणाऱ्या पांढऱ्या पाण्याचा रंग आणि वास बदलल्यास आजाराचे लक्षण समजून त्यावर उपचार घेतले पाहिजेत. स्वतःच्या नैसर्गिक स्त्रावाचा वास आपल्या परिचयाचा असतो. नेहमीपेक्षा वेगळा दुर्गंधीयुक्त वास असल्यास आजाराच लक्षण समजून त्यावर उपचार केले पाहिजेत.
लैंगिक अवयावासंबधी त्रास किंवा आजराविषयी बोलण्याची लाज वाटल्यामुळे त्यावर उपचार घेतले जात नाहीत. पण लाज वाटून, लपवून हे आजार बर होणार नाहीत. शरीराच्या इतर आजारांप्रमाणेच हेही आजार आहेत. त्यावर उपचार होऊ शकतात. त्यामुळे न घाबरता आपल्या त्रासाविषयी बोला आणि मदत घ्या.
2 Responses
मला मासीक पाळी ही वेळेवर येत नाही कधी कधी म्हणजे ५-६ महीने येते वेळोवेळी आणि नंतर मग ५-६ महीन्यात चुकते म्हणजे परत २-३ महीन्यांनी येते तर मी डॉक्टरांचा सल्ला घेतला तर ते बोलले की हारमोन्स बदलावामुळे होत पण मला ह्याची भीती वाटत आहे तर माझ्या मैत्रीणी म्हणतात की पुढे याचा गरोदरपणात धोका येऊ शकतो तर मला भीती आहे अस काय होऊ शकतं काय…?
स्त्री-पुरुषांमध्ये अन्डोत्सर्जनच्या आधी आणि नंतर काही दिवस लैंगिक संबंध आले की गर्भधारणा होते. ज्या स्त्रियांची मासिक पाळी अनियमित असते त्यांना अन्डोत्सर्जनचा काळ ओळखणं अवघड होतं. पण शरीरात, योनीमार्गात, योनिस्रावात होणाऱ्या इतर बदलांवर लक्ष ठेवले तर हा काळ ओळखून त्या काळात संबंध ठेवून गर्भधारणेसाठी प्रयत्न केले जाऊ शकतात. पाळीचक्र आणि अन्डोत्सर्जन काळ आणि त्या काळात शरीरात होणारे बदल याविषयी सविस्तर माहितीसाठी खालील लिंक्सवरील लेख वाचा.
https://letstalksexuality.com/fertility-and-sexuality-awareness/
https://letstalksexuality.com/menstrual-and-fertility-cycle/
https://letstalksexuality.com/fertility-signs/
https://letstalksexuality.com/%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%93%E0%A4%B3%E0%A4%96-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%A8-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE/
https://letstalksexuality.com/changes-in-cervix-in-fertility-cycle/
https://letstalksexuality.com/fertility-cycle-changes-in-the-body/
https://letstalksexuality.com/%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%93%E0%A4%B3%E0%A4%96-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%AB-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80/