नात्यामध्ये प्रेम, जिव्हाळा, कधी भांडण, कधी अबोला… कपल्समध्ये काही गोष्टी किती कॉमन असतात ना? हे सगळं सगळं समलिंगी जोडप्यांमध्ये सुद्धा असतं. पण या नात्याचा उत्सव मात्र त्यांच्यासाठी नाही कारण ही लैंगिक ओळख अजूनतरी समाजमान्य नाही.
स्वतःच्या अस्तित्वाची ओळख अशी लपवून जगावं लागणं तेही आप्तस्वकीयांपासून यासारखी अत्यंत क्लेशदायक गोष्ट नाही. ती एक प्रकारची घुसमटच आहे.
प्रेम ही युनिवर्सल भावना आहे. मग ते नातं समलिंगी असो वा भिन्नलिंगी. अशीच एक समलिंगी प्रेमकथा तुमच्यासाठी घेऊन येत आहे.
‘सेक्स अणि बरंच काही’ पॉडकास्ट ऐकत रहा आणि तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा.
या कहाणीचा दुसरा भाग ऐकण्यासाठी सेक्स अणि बरंच काही- एपिसोड ४- समलिंगी प्रेमकहाणी-भाग २ या लिंंकचा वापर करा.
No Responses