मुलाने तो ‘गे’ आहे हे सांगताच लहानपणापासूनचे सर्व दिवस माझ्यासमोर आले. त्याचे ते सौम्य मृदुमुलायम वागणे, स्त्रीत्वाकडे झुकणारी त्याची मनोवस्था, कामाचा आढावा घेण्याची पद्धत आणि समज, इतरांच्या विशेषतः स्त्रियांच्या मनातील आचारविचार, त्यांच्या भावभावनांचा विचार करणे, मला काय हवे आहे ते चटकन ओळखणारा, या सर्व गोष्टींचा उलगडा एका क्षणात झाला.
त्याला एक मोठी बहीण आहे. ती तिच्या मैत्रिणींसोबत भातुकली, बाहुला बाहुलीचे लग्न इ. मुलींचे खेळ खेळत असे. अर्थात तोही त्यात सामील होत असे. त्यांच्यासारखीच वागण्याची झलक त्याच्यात दिसायची.
त्याचे वडील पारंपारिक रीतीरीवाजांवर गाढ श्रद्धा असणारे, ते जपण्यातच आनंद मानणारे, खूप सनातनी व कर्मठ ब्राह्मण होते. या त्यांच्या वागण्यातून अनेकदा इतरांच्या भावभावनांचा चक्काचूर होत असे. त्यामुळे मुलांच्या मनातही त्यांच्याबद्दलची एक अढी, आकस निर्माण झाला. तो त्यांच्या जवळही जात नसे. त्यांना पाहून तो खूप घाबरत असे.
त्यावेळी तो खूप अबोल होता. बहुतेक, घरातील वरील वातावरणाचा तो परिणामही असेल. पण आता तो सांगतो त्याप्रमाणे, तेव्हा तो त्याचे विचार आम्हाला सांगू शकत नव्हता. वडिलांसमोर अशा गोष्टी बोलणे अशक्यप्रायच होते. कारण इतरांना समजावून घेण्याची त्यांची विचारपद्धतीच नव्हती.
शाळेत असताना इतर मुळे त्यला चिडवत असत, त्याची थट्टा करत असत; पण हे तो उघडपणे कोणालाच सांगू शकत नव्हता. त्यावेळी त्याच्या मनाला किती वेदना झाल्या असतील, त्याने किती त्रास सोसला असेल, त्याच्या भावनांचा, विचारांचा किती कोंडमारा झाला असेल हे आता माझ्या लक्षात आल्यावर मला खुप वाईट वाटलं. पण हीच गोष्ट त्यावेळेला तो माझ्यासमोर बोलला असता तर मी ती स्वीकारली असती का? मान्य केली असती का? अशी अनेक प्रश्नचिन्हे माज्या मानत निर्माण झाली
मी एक मध्यमवर्गीय गृहिणी. सर्वसामान्यांच्या घरात जसे रितीरिवाज, पद्धती असतात, सणवार असतात ते प्रामाणिकपणे करणारी एक माता. मुलांचे शिक्षण, लग्न या जबाबदारीतून मुक्त होवू पाहणारी मुलीचे लग्न झाल्यावर सहजच मुलाच्या लग्नाचा विषय घरात निघू लागला. नातेवाईक, ओळखीपाळखीचे, हितचिंतक लग्नाबाबत खडा टाकुन पाहू लागले, मीही सून येणार या आनंदाने मन ताठ करून पाहू लागले.
एके दिवशी माझ्या धाकट्या मुलाने मला अक्षय बद्दल सांगितले. मी भीत भीत अक्षयला विचारले, की तुला काही सांगायचं आहे का? त्याने प्रथम टोलवाटोलवी केली. मग म्हणाला, मला तुझ्याशी बोलायचंय.”
त्याने जेव्हा तो ‘गे’ आहे हे सांगितले तेव्हा मी हादरले, चक्रावले. माझा लहान मुलगा माझ्या मदतीला धावला. त्याने ‘गे’ म्हणजे काय असते ते समजावून सांगितले.
मोठा मुलगा म्हणाला, “ मला मुलाबद्दल आकर्षण, प्रेम वाटते. मग मी कशाला एखाद्या मुलीचे नुकसान, फसवणूक करू? तुझ्या समाधानासाठी, नातेवाईकांसाठी लग्न करून तिला घटस्फोट द्यायची वेळ आली तर तुला ते जास्त क्लेशकारक होईल.” माझ्या मनाची तयारी व्हायला वेळ लागला.
त्याच अवधीत त्याने ‘गे’ लोकांसाठी ‘प्रयत्न’ हा ग्रुप सुरु केला. मी पण एक दोनदा त्यांचे सिनेमे, मिटींगला गेले होते. त्यानंतर त्याने तेथे पालकांची एक सभाही आयोजित केली. तेथे पालकांनी आपापली मनोगते व्यक्त केली. त्यामुळे इतर जे पालक होते तेही आपले अनुभव सांगण्यासाठी पुढे सरसावले.
आपले पालक आपल्या पाठीशी आहेत, या विचाराने बिचारी भांबावलेली मुळे जरा शांत झाल्यासारखी झाली. परिस्थितीने बावचळलेली मुळे आसरा मिळालेल्या वासरासारखी निर्धास्त झाली.
मी मनात विचार करू लागले, की खरंच या मुलांचा काय दोष, अपराध? आणि पालकांचा तरी काय अपराध? तशी सर्वसामान्य स्त्री- पुरुषांची एकमेकांबद्दल आकर्षण असणारी आसक्ती याही मुलांमध्ये असतेच. फक्त फरक इतकाच, की त्यांना समलिंगी आकर्षण वाटत असतं.
पण आपला पुरातनवादी समाज हे मान्य करेल का? त्यांना आपल्यातलेच समजतील का? त्यांना रीतसर लग्न करून जोडप्यासारखे राहता येईल का? असं विचार सगळेच करणार नाहीत, पण ज्यांची मुले ‘गे’ आहेत त्यांनी तरी आपल्या पाल्याच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून त्यांना आधार दिला पाहिजे. तरच ही मुले समाजाला सामोरी जात आपले ईप्सित साध्य करू शकतील. थोडक्यात, आचारांची, विचारांची क्रांती होणे आवश्यक आहे, पण त्यासाठी काही काळ जाणे आवश्यक आहे.
या सर्वच मुलांना योग्य साथीदार मिळो अशी ईशचरणी प्रार्थना करून मी त्यांना सांगू इच्छिते. ‘गर्व से कहो हम ‘गे’ है I’
साभार: बिंदुमाधव खिरे यांनी संकलन केलेल्या “मनाचिये गुंती- ‘गे’ मुलामुलींच्या पालकांच्या आत्मकथा” या पुस्तकातील श्रीमती अनामिका- अक्षयची आई यांनी लिहिलेली कथा. सदर पुस्तक रसिक साहित्य, साधना ग्रंथ प्रदर्शन, शनिवार पेठ, मॅजीस्टीक बुक स्टोअर, पुणे यासाठी विक्रीसाठी उपलब्ध.
Image courtesy: http://vickybeeching.com
2 Responses
Hi isoch team
Maz vay 24 aahe pn mi ajun sudha ekdahi sex kelela nahi…. ani gharche lgn karu icchit ahe pn ligavaril skin mage jaat nahi.. ling tatharle tarihi . tyasathi kay karu….. mala mazya honarya baykosobat sex kartanahi bhiti vatte.
Plz help mi yaaar….
TrishulNiharGauriEkta plz
लिंगाच्या टोकाला एक फुगीर भाग असतो ज्याला शिस्नमुंड म्हणतात. शिस्नमुंडावर एक त्वचा असते. मुलगा तारुण्यात आल्यावर ही त्वचा हळूहळू मागे नेता येते. काही मुलांची शिस्नमुंडावरची त्वचा खूप आवळलेली/टाईट असते व मागे सरकवता येत नाही. याला ‘फायमॉसिस’ म्हणतात. फायमॉसिस असलेले पुरुष आपल्या जोडीदारासोबत जेव्हा सेक्स करायला जातात तेव्हा त्वचा मागे सरकायला त्रास होतो व खूप दुखतं. त्यामुळे संभोग करताना खूप त्रास होतो. आपल्याला अशी अडचण आहे का हे डॉक्टरांकडून तपासून घ्या. डॉक्टरांनी फायमॉसिसचं निदान केलं तर छोटीशी शस्त्रक्रिया करून शिस्नमुंडावरचं कातडं काढून टाकलं जातं. याला सुंता करणं म्हणतात. सुंता केल्यानंतर शिस्नमुंड उघडं राहतं. सुंता केल्यानं लैंगिक सुखास बाधा येत नाही. तुम्ही विचारले आहे की लिंगावरील त्वचा हाताने मागे घेतली तर चालते का? हे खरंतर शिस्नमुंडावरची त्वचा कितपत आवळलेली/टाईट यावर अवलंबून असेल. हाताने मागे घेऊन इजा होण्याची शक्यता आहे का? याबाबत योग्य त्या डॉक्टरांचा सल्ला घेणे जास्त योग्य असेल. (फायमॉसिसची माहिती ‘मानवी लैंगिकता’ या बिंदू माधव खिरे यांच्या पुस्तकातून साभार)