विविध प्रकारची लैंगिकता आणि लैंगिक कल

वयात आल्यावर किंवा वयात येत असताना आपल्यात लैंगिक इच्छा निर्माण होऊ लागतात. आपल्याला आवडणाऱ्या व्यक्ती किंवा व्यक्तींबद्दल लैंगिक आकर्षण वाटायला लागतं. त्यांच्यावर प्रेम करावं, त्यांच्याबरोबर लैंगिक क्रिया करावी अशी इच्छा निर्माण व्हायला लागते. हे आकर्षण तीन प्रकारचं असू शकतं. भिन्नलिंगी, समलिंगी किंवा उभयलिंगी.

अनेक मुलांना भावनिक आणि लैंगिक आकर्षण फक्त मुलींबद्दल वाटतं. अनेक मुलींना लैंगिक व भावनिक आकर्षण फक्त मुलांबद्दल वाटतं. याचा अर्थ या मुलांचा किंवा मुलींचा लैंगिक किंवा भावनिक आकर्षणाचा कल विरुद्ध लिंगाच्या व्यक्तीकडे असतो. अशा विरुद्ध लिंगी व्यक्तीकडे असणाऱ्या लैंगिक किंवा भावनिक कलाला भिन्नलिंगी लैंगिक कल म्हणतात. इंग्रजीत याला हेटरोसेक्शुअल म्हणतात.

काही मुला-मुलींना दोन्ही लिंगाच्या व्यक्तींबद्दल भावनिक व शारीरिक आकर्षण वाटतं. मुलींना मुलं आणि मुली दोघांबद्दल लैगिक आकर्षण वाटतं आणि मुलांना देखील मुलं आणि मुली दोघांबद्दल लैंगिक आणि भावनिक आकर्षण निर्माण होतं. अशा आकर्षणाला उभयलिंगी लैंगिक कल असं म्हणतात. उभयलिंगी कल असणाऱ्या व्यक्ती गोंधळलेल्या असतात असा मात्र याचा अर्थ होत नाही. एका व्यक्तीला एकाच लिंगाच्या व्यक्तीबद्दल आकर्षण वाटलं पाहिजे असा काही निसर्गाचा नियम नाही.

काही मुला-मुलींना केवळ त्यांच्याच लिंगाच्या व्यक्तींबद्दल लैंगिक आकर्षण वाटतं. म्हणजेच मुलांना फक्त मुलांबद्दल आणि मुलींना फक्त मुलींबद्दल लैंगिक आणि भावनिक आकर्षण वाटतं. याचा अर्थ या मुला-मुलींचा लैंगिक-भावनिक आकर्षणाचा कल समलिंगी असतो. अशा व्यक्तींना समलिंगी कलाच्या किंवा समलिंगी व्यक्ती म्हणतात. इंग्रजीत समलिंगी मुलांना किंवा पुरुषांना गे म्हणतात तर समलिंगी मुली किंवा स्त्रियांना लेस्बियन म्हणतात.

कोणत्याही व्यक्तीबाबत निर्माण होणारं लैंगिक आकर्षण नैसर्गिक किंवा स्वाभाविक आहे. त्यात चुकीचं असं काहीही नाही.

लैंगिक कलाबद्दल किंवा निवडीबद्दल समजून घेताना एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. वयात येताना कधी कधी काही भिन्नलिंगी मुला-मुलींना समलिंगी आकर्षण निर्माण होऊ शकतं. कालांतराने दोन तीन वर्षात असं आकर्षण नाहिसं होतं आणि त्यांना परत भिन्नलिंगी व्यक्तींबद्दल आकर्षण वाटू लागतं. त्यामुळे वयात आल्यावर लगेचच आपला लैंगिक कल स्पष्ट होतो असं नाही. मात्र सर्वसाधारणपणे 18 वर्षाचे होईपर्यंत आपल्याला आपला कल काय आहे आणि आपल्या मनात कोणाविषयी, कोणत्या लिंगाच्या व्यक्तीविषयी आकर्षण निर्माण होतं हे स्पष्ट होतं.

यापेक्षा महत्वाची गोष्ट ही आहे की सर्व प्रकारचे लैंगिक कल स्वाभाविक किंवा नैसर्गिक आहेत. भिन्नलिंगी कल हा नॉर्मल आणि बाकीचे अबनॉर्मल, विकृत हा समज पूर्णपणे चुकीचा आहे. समलैंगिकता किंवा उभयलैंगिकता काही आजार नाही. त्यामुळे त्यावर कसले उपाय करण्याची गरज नाही किंबहुना कोणत्याच उपायाने (समुपदेशन, औषध गोळ्या, गंडे दोरे, सक्तीने केलेलं लग्न) लैंगिक कल बदलता येत नाही. ज्याला त्याला आपलं आयुष्य आपल्या इच्छेप्रमाणे आणि मर्जीप्रमाणे जगता आलं पाहिजे. त्यामुळे आपणही सर्व प्रकारच्या लैंगिक कल असणाऱ्या व्यक्तींचा स्वीकार करायला शिकलं पाहिजे. त्यांच्यावर होणाऱ्या भेदभावाला विरोध केला पाहिजे.

काही जण अलैंगिक  (Asexual) असतात. म्हणजेच काही जणांना कुणाही विषयी लैंगिक आकर्षण वाटत नाही. लैंगिक संबंध न ठेवणं किंवा ब्रह्मचर्य आणि अलैंगिकता यामध्ये मात्र फरक आहे. लैंगिक संबंध न ठेवण्याची किंवा लैंगिक नाती न जोडण्याची कारणं सामाजिक किंवा सांस्कृतिक असू शकतात. पण अलैंगिकता म्हणजे मुळातूनच लैंगिक आकर्षण न वाटणं.

अलैंगिक असणाऱ्या व्यक्ती प्रेम किंवा लग्नाची नाती जोडू शकतात. पण त्यामध्ये लैंगिक आकर्षण असेलच असं नाही. अलैंगिक असणं, लैंगिक भावना किंवा इच्छा नसणं हे स्वाभाविक नॉर्मल आहे. आपल्यामध्ये काही तरी कमी आहे असं मानण्याची किंवा स्वतःला अपराधी मानण्याचं कारण नाही.

लैंगिक कल, आवड, इच्छांचा विचार करताना त्यातील वैविध्य समजून घेणं आवश्यक आहे.

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल…

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल...

9 Responses

  1. sunil says:

    I like this website.

  2. Dr. Vinayak युवा समुपदेशक says:

    आपल्या प्रयत्नाचे हार्दिक स्वागत

    बरेच दिवसापासुन न चर्चित विषय जो खुप महत्वपूर्ण आहे त्यावर आता खुली चर्चा होईल व अनेकांचे गैरसमज दुर होतील युवा वर्गाला याचा निश्चित फायदा होइल व आपले विचार मांडायला एक व्यापक व्यासपीठ मिळेल

    मी युवा समुपदेशनाचे काम गेल्र्या २ वर्षापासुन करीत आहे
    आपल्या उपक्रमाला माझा नेहमीच पाठिंबा व सहकार्य राहील
    संपर्क – 7588167721

    या I soch टीम चे हार्दिक अभिनंदन

    • I सोच says:

      प्रिय डॉ. विनायक (युवा समुपदेशक)
      लैंगिकतेबद्दल खुलेपणानं बोललं जावं यासाठीच हा मंच आहे. तुमचे अनुभव, मतं, विचार लिहून पाठवा. आपण जितका जास्त संवाद साधू तितकी या विषयाबाबत असणारी चुप्पी तोडायला मदत होईल,
      लिहीत रहा…

  3. Siddhartha Garud says:

    Its good sire for adolescence…and very important imformation 4 every one..

    • I सोच says:

      सर्व वयाच्या मुला-मुलींसाठी आणि स्त्री पुरुषांसाठी ही साइट उपयोगी पडेल अशीच आमची इच्छा आहे. तुमचे अनुभव, शंका, उत्तरं, विचार जरूर लिहून पाठवा. जास्तीत जास्त लोकांनी या साइटवर लिहावं आणि त्याचा उपयोगही करावा तरच लैंगिकतेबद्दल मोकळा संवाद सुरू होऊ शकेल.

  4. valmik chavan says:

    sex education for teenagers is must….i am a teacher in z p school .i teach science n maths to std 6-8 th class. our female students n male students in rural area feel shy to express their problems.
    anyway this website design really nice to understand the facts about human body and science.

    • I सोच says:

      Dear Valmik Chavan,
      Thank you for your reply. It is good that you find the site useful.
      Pls write your experiences, opinions on sex education and other issues of rural students. We would like that this site provides a platform for different people to write their experiences.Also suggest topics, issues that you would like to have information on.

  5. Pc says:

    I need help
    I am worried and stressed about future .
    I am Homosexual.
    Can’t focus on anything.
    Anxiety and stress issue.
    Please help someone.

    • I सोच says:

      लैगिकतेच्या विविध प्रश्नांवर समपथिक ट्रस्ट द्वारे दर सोमवारी हेल्पलाईन चालवली जाते. सोबत माहिती देत आहोत.
      Samapathik Trust (1444 fetch gut)
      1004, Budhwar Peth, Office No. 9,
      Rameshwar Market, Near Vijay Maruti Chowk,
      Pune-411 002.
      Landline (020) 64179112,
      Helpline 9763640480 (Mondays 7 pm to 8 pm)
      Email samapathik@hotmail.com
      http://samapathik.org/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copy link
Powered by Social Snap