प्रशिक्षकांसाठी

लैंगिकता समजून घेताना…

शाळा, संस्था संघटना अशा कित्येक ठिकाणी शिक्षक वा प्रशिक्षक म्हणून संवाद साधताना काही पातळ्यांवर स्वत:वर काम करावे लागेत. ज्यामध्ये माहितीने परिपूर्ण असणे, लैंगिकतेबाबतचा दृष्टीकोन तयार होणे, शब्दांचा योग्य वापर, सादरीकरण, अन अशा कित्येक बाबी असू शकतात. प्रशिक्षक म्हणून काम करत असताना हयासंदर्भातील मार्गदर्शक संसाधने वेबसाइट वर उपलब्ध आहेत.

प्रशिक्षकांसाठी-लैंगिकता समजून घेताना…

शाळा, संस्था संघटना अशा कित्येक ठिकाणी शिक्षक वा प्रशिक्षक म्हणून संवाद साधताना काही पातळ्यांवर स्वत:वर काम करावे लागेत. ज्यामध्ये माहितीने परिपूर्ण असणे, लैंगिकतेबाबतचा दृष्टीकोन तयार होणे, शब्दांचा योग्य वापर, सादरीकरण, अन अशा कित्येक बाबी असू शकतात. प्रशिक्षक म्हणून काम करत असताना हयासंदर्भातील मार्गदर्शक संसाधने वेबसाइट वर उपलब्ध आहेत.

आपले शरीर

मानवी शरीररचना, वयात येताना शरीरात होणारे बदल, मासिकपाळी, हस्तमैथुन, त्यासंदर्भातील समज- गैरसमज

पुढे वाचा

नातेसंबंध

नातेसंबंधामधील महत्त्वाची मूल्ये, नात्यांमधील दबाव व बंधने, प्रेम, आकर्षण, मैत्री, ब्रेक अप, पॅच अप.

पुढे वाचा

लैंगिक आरोग्य

एच आय व्ही व इतर लिंगसांसर्गिक आजार (STI’s), प्रजनन मार्गाशी निगडीत आजार, लैंगिक समस्या.

पुढे वाचा

प्रजनन आणि गर्भनिरोधन

गर्भधारणा कशी होते, गर्भनिरोधनाची विविध साधने, गर्भसमाप्ती (Abortion).

पुढे वाचा

लिंगभाव व लैंगिक ओळख

पुरुष किंवा स्त्री असणे म्हणजे काय?, LGBTQAI+, समलिंगी संबंध म्हणजे काय? विविध लैंगिक अभिव्यक्ती (sexual expressions).

पुढे वाचा

लैंगिकता आणि हिंसा

शारीरिक, मानसिक व लैंगिक शोषण किंवा हिंसा, विवाहांतर्गत शारीरिक जबरदस्ती, बाल-लैंगिक शोषण.

पुढे वाचा

लैंगिकता व मानसिक आरोग्य

लैंगिक समस्यांशी निगडीत मानसिक ताण तणाव, नैराश्य, चिंता, सेल्फ हार्म.

पुढे वाचा

अपंगत्व आणि लैंगिकता

विविध अपंगत्व असलेल्या व्यक्तींचे लैंगिक आरोग्य, अभिव्यक्ती, हिंसा, सुरक्षितता व अधिकार, पालकांसाठी व शिक्षकांसाठी मार्गदर्शन.

पुढे वाचा

लैंगिकता व कायदा

लैंगिकता व त्यासंदर्भातील विविध कायदे (पोक्सो, कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ, इ.), लैंगिक अधिकार.

पुढे वाचा

लैंगिकता व इंटरनेट

पोर्नोग्राफी, डेटींग अ‍ॅप, सायबर स्टॉकिंग, ऑनलाइन अ‍ब्युज.

पुढे वाचा

लैंगिकता व संस्कृती

प्राचीन काळापासून लैंगिकतेबद्दलच्या कल्पना, रुपके, मिथके कशी बदलत गेली यासंदर्भातील काही पुरातन कथा व विश्लेषण.

पुढे वाचा

व्हिडिओ

अमेज व्हिडिओ

इतर साहित्य

अमिला विचारा

शंका, प्रश्न, चिंता, टेन्शन…हे विचारू का? पण कोणाला विचारू? अशी शंका विचारली तर लोक काय म्हणतील? लैंगिकतेविषयीच्या प्रश्नांसंदर्भात आपल्या प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी हे विचार येऊन गेले असतील. ह्या विषयाबद्दल फारसे बोलले जात नाही. पण या विषयाबद्दलच्या मोकळ्या सवांदाने व योग्य माहितीने बरेच प्रश्न सुटू शकतात. त्यामुळे मनातल्या शंका, प्रश्न, गोंधळ अमिला सांगा. अमि एक बॉट असून तुम्ही अमिला लैंगिक आरोग्य, मैत्री, प्रेम, नातेसंबंध आणि अशा बर्‍याच विषयांबद्दल प्रश्न विचारू शकता. तुम्हाला जे वाटतंय् ते मोकळेपणाने अमिला विचारा. अमि त्याची उत्तरं देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. लैंगिकतेविषयी फारसे बोलले जात नसल्यामुळे त्यासंदर्भातील प्रश्न विचारताना वापरले जाणारे शब्द हे बहुतेक वेळा बोली भाषेतील किंवा शिव्यांमध्ये वापरले गेलेले असतात. पण अमिला ते शब्द कळणार नाहित व त्यामुळे तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळणार नाही. त्यामुळे आम्ही इथे एक लिंक देत आहोत ज्यात बोलीभाषेतील शब्दांना काही पर्यायी शब्द दिलेले आहेत जे तुम्ही अमिला तुमचा प्रश्न विचारताना वापरु शकता. जेणेकरुन अमिला तुमचा प्रश्न कळेल व त्याचे नेमके उत्तर देता येइल.

महत्वाचे प्रश्न

ब्लू फिल्म किंवा पोर्नोग्राफी पाहणे हा आपापल्या निवडीचा भाग असू शकतो. अनेकदा अनेकांसाठी लैंगिक संबंधांबद्दल माहिती मिळवण्याचे दुसरे कुठलेली साधन न मिळाल्याने पोर्न पाहाणे ह्यालाच ते लैंगिक शिक्षण मानू लागतात. पोर्नोग्राफिक व्हिडीओज मध्ये दाखवलेल्या सर्व गोष्टी ख-या नसतात. त्यातील कृती, वेळ या सगळ्यामध्ये अतिशयोक्ती असते. तसेच त्यात स्त्रियांचे वस्तूकरण, त्यांचा अनादर करण्याची वृत्ती दिसते व संमतीशिवाय केलेल्या, हिंस्र लैंगिक कृतींचे गौरवीकरण केलेले असते. त्यामुळे पोर्नोग्राफीस प्रमाण मानून त्याचा खऱ्या लैंगिक आयुष्यावर प्रभाव पडू देऊ नये. स्वतःच्या करमणुकीसाठी पॉर्न बघण्यात वावगे काही नाही. पण त्यातून कधीकधी स्वतःच्या लैंगिक कृतीविषयी चिंता, आपल्या शरीराविषयी, अवयवांविषयी कमतरतेची भावना निर्माण होताना दिसते. त्यातून चुकीची स्व-प्रतिमा, काळजी, तुलना ह्या गोष्टी घडतात. आपल्या जोडीदाराची पोर्नोग्राफीतील कलाकारांशी तुलना करणे, त्यांच्याकडून पोर्नोग्राफीमध्ये दाखवल्याप्रमाणे कृती करण्याच्या अपेक्षा धरणे, तिथे दाखवलेली जबरदस्ती प्रत्यक्षात अवलंबणे हे योग्य नाही.

मासिक पाळीदरम्यान रक्त शोषण्यासाठी नाही तर रक्त गोळा करण्यासाठी म्हणुन मासिक पाळीचा कप योनीमध्ये सरकवला जातो. हे कप रबर किंवा सिलिकॉन सारख्या लवचिक पदार्थांचे बनलेले असतात. कप कधी भरला आहे ते बाहेरुन समजू शकत नाही, म्हणून दिवसातून एक- दोन वेळा कप रिकामा करावा लागतो. त्यासाठीच्या सूचना कपासोबत दिलेल्या असतात.  हा कप बराच काळ वापरता येतो.  दर पाळीच्या वेळेस वापरण्यापूर्वी तो स्वच्छ व निर्जंतुक (पाण्यात उकळून) करून वापरावा नाहीतर जंतुसंसर्ग होण्याची शक्यता असू शकते.

मुलामुलींना खरी, शास्त्रीय आणि सकारात्मक माहिती आश्वासक शब्दात द्यावी. त्यासाठी स्वत: ती माहिती मिळवून व स्वत:च्या मनाची तयारी करणे ही पहिली पायरी असेल. काही प्रश्नांची उत्तरे येत नसतील तर येत नाही हे सरळ व स्पष्ट सांगता आले पाहिजे. खोटे बोलून वेळ मारून नेऊ नका. सांगताना लाजू नका, शरमू नका. लैंगिकतेबद्दल वयानुरूप, पण मोकळेपणाने बोलणे महत्त्वाचे आहे. मुलांशी काही गोष्टी नक्की बोलता येतात.

आपल्याला सांगणे जमणार नसेल तर मुलांना समजेल अशा सोप्या भाषेत लिहिलेले लैंगिकता / लैंगिक शिक्षणावरचं पुस्तक त्याना भेट दयावे किंवा नजरेस पडेल अशा जागी ठेवावे.(https://tarshi.net/downloads/red-book.pdf, https://www.tarshi.net/downloads/blue-book.pdf, डॉ. अनंत साठे व डॉ.शांता साठे लिखित हे सारं मला माहीत हवं! आणि पालकांसाठी काय सांगू? कसं सांगू? )काही सामजिक संस्था ज्या लैंगिक आरोग्य वा लैंगिकता विषयात काम करत आहेत, त्यांचीही मदत घेऊ शकता.”

सम किंवा भिन्न लैंगिक कल असणे ही गोष्ट वरपांगी समजणारी नाही. त्या व्यक्तीला समलैंगिक व्यक्तीबद्दल लैंगिक ओढ वाटण्यावरून ते समजते.

लोक याबद्दल देखील विचारतात

काही वेळा एखादा प्रश्न/शंका नेमक्या शब्दांमध्ये मांडता येत नाही किंवा इतरांनी विचारलेले प्रश्न आपल्याला कधी पडलेले नसतात व त्यांची उत्तरेही आपल्याला माहित नसतात. काही वेळेस प्रश्न पडलेले असतात पण विचारायला संकोच वाटतो. काही मित्र-मैत्रिणिंनी आम्हाला विचारलेले प्रश्न व आम्ही दिलेली उत्तरे तुम्हाला इथे वाचता येतील.

मुलं आणि मुली वयात येण्याच्या आणि त्या नंतरच्या काळात त्यांना एकमेकांबद्दल आकर्षण वाटू लागतं. सध्याच्या काळात मुलींचं वयात येण्याचं वय 9 वर्षं धरलं जातं आणि मुलांचं 11. त्यामुळे अगदी चौथा पाचवीपासूनच एकमेकांबद्दल काही तरी ओढ वाटू लागते असं दिसून येत आहे. सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये नक्की कुणाकडे मन आणि शरीर आकर्षित होईल हे सांगता येत नाही. सिनेमातले हिरो, शेजारी राहणारी एखादी मुलगी, शाळेतले शिक्षक, शिक्षिका, रोज जाता येता भेटणारी कुणी व्यक्ती अशा कुणाही बाबत शारीरिक आणि मानसिक आकर्षण वाटू शकतं. सर्वात आधी हे वाटतं आणि तसं वाटणं म्हणजे भलतंच काही तरी नाही हे मान्य करू या.

मुलांना नावं न ठेवता आणि आकर्षण, प्रेम या थिल्लर गोष्टी आहेत असं न मानता मुलांशी बोललं, त्यांना खरी, शास्त्रीय आणि सकारात्मक माहिती दिली तर मुलं चुकीच्या, हिंसक मार्गाकडे जात नाहीत. त्यासाठी लैंगिकतेबद्दल मोकळेपणाने बोलणं महत्त्वाचं आहे.
मुलांशी काही गोष्टी नक्की बोलता येतात –

शारीरिक आकर्षण आपल्याला कुठे घेऊन जातंय हे आपण ओळखू शकतो आहोत का?
त्याची पुढची पायरी शारीरिक संबंध आहेत का, असे संबंध म्हणजे काय?
स्पर्श वाईट नसतो पण तो संमतीने आणि मोकळेपणाने झाला, केला पाहिजे.
टीव्ही, इंटरनेट, फिल्म्स, सिनेमा, गाणी या सर्वांतून शारीरिक आकर्षण आणि शरीर संबंधांविषयी अनेक गोष्टी पहायला मिळत असतात. त्या सर्वांचा अर्थ काय हे समजून घेऊन मगच ते योग्य का अयोग्य ते ठरवा.

काहीही सिद्ध करण्यासाठी, कुणाशी पैज जिंकण्यासाठी, प्रेम सिद्ध करण्यासाठी, करायलाच पाहिजे म्हणून कुणाशी शारीरिक संबंध असावेत हे आवश्यक नाही. प्रेम व्यक्त करण्याचं आणि एकमेकांना जवळ आणणारं अतिशय सुंदर नातं शारीरिक संबंधांमधून निर्माण होऊ शकतं. पण त्यासाठी एकमेकांची संमती, विश्वास आणि एकमेकांबद्दल कम्फर्टेबल असणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे.
आकर्षण कुणाहीबद्दल वाटू शकतं. पण म्हणून समोरच्याच्या मनातही तेच असेल असं नाही हे स्वीकारायला पाहिजे. खास करून मुलांना हे जास्त छान समजावून सांगायला पाहिजे.
मुला-मुलींशी स्वतंत्रपणे हे विषय बोलता येतात.

मुलांची निरीक्षण क्षमता प्रचंड असते. घर, परिसर, मित्र, शाळा या अवकाशामधून ते अनेक अनुभव मिळवतात, त्यांचे अर्थ लावतात. शिवाय टीवी,मोबाईल, इंटरनेट सारखी माध्यमं त्यांच्यावर प्रभाव टाकत असतात. त्याच्या मनात अनेक प्रश्नांची निर्मिती सातत्याने होते आणि त्यांची उत्तरंही ते शोधतात. अनेकदा ती योग्य किंवा अयोग्यही असतात. चूक किंवा बरोबरही असतात. या विषयांवर आम्ही जेंव्हा मुलांशी संवाद साधतो तेंव्हा मुलं आपल्याला कल्पना करता येणार नाही किंवा संवाद कर्त्याला अचंभित करतील असे प्रश्न विचारतात. लैंगिक अवयव, त्यांची नाव, त्यांचे अर्थ, प्रेम-मैत्री-आकर्षण, फ्रेन्डशिप-लवशीप ते मूल कसे होते, लैंगिक संबंध, मासिक पाळी आणि फ्लेवर्ड कन्डोम्स कशासाठी असतात ई प्रश्न सर्रास येतात. विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची ही निव्वळ झलक आहे.

अर्थातच जे संवादक मुलांसोबत हा संवाद साधत आहेत त्यांचा विषय, आशय, संवाद करण्याच्या पद्धती आणि संवेदनशीलता अशा अनेक पातळ्यांवर कस लागतो. त्यांनी या सर्व मुद्द्यांच्या अनुषंगाने तयार असणं, प्रशिक्षित असणं अपेक्षित आहे. चांगला संवादक होण्याची ती अट आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे कुठल्याही प्रकारचा विषम, पूर्वग्रहदुषित दृष्टीकोन संवादाकाचा असेल तर हा संवाद ‘संवाद’ होत नाही.

किशोरवयीन मुलांसाठीच्या शाळेच्या नियमित अभ्यासक्रमात लैंगिकता शिक्षण (sexuality education) किंवा शरीर साक्षरता (body Literacy) या विषयाचा समावेश असायला हवा हा विचार अनेक शिक्षणतज्ञ आणि संस्था दीर्घ काळापासून मांडत आहेत. या विषयाचे महत्व सावकाश का होईना पण आपल्या समाजाच्या आणि शासनाच्या लक्षात येत आहे. तसं पहिला गेलं तर शैक्षणिक धोरण, नियमित अभ्यासक्रम आणि पाठ्य पुस्तकांत आजही खऱ्या अर्थाने या विषयाचा समावेश झालेला नाही. परंतु अनेक खाजगी स्थानिक शिक्षण संस्था, काही महानगर पालिकांच्या शाळा असे प्रयोग करताना दिसत आहेत.

एच आय व्ही म्हणजेच ह्यूमन इम्युनो डेफिशिअन्सी व्हायरस (HIV – Human Immune-Deficiency Virus). शरीराची प्रतिकारशक्ती कमी करणारा विषाणू. एड्स म्हणजे अक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिण्ड्रोम (AIDS – Acquired Immune-Deficiency Syndrome). ही आजाराची एक अवस्था आहे. या संसर्गामध्ये शरीराची प्रतिकारशक्ती नष्ट व्हायला लागते. याचा परिणाम म्हणजेच शरीर कोणत्याही प्रकारच्या जंतुलागणीचा मुकाबला करू शकत नाही. एचआयव्हीचं रुपांतर काही काळाने एड्समध्ये होतं. एचआयव्ही बरा होऊ शकत नाही. मात्र आता औषधं आणि योग्य आहाराच्या मदतीने एचआयव्ही असला तरी चांगलं आयुष्य जगता येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शरीरातील स्रावांमधून एचआयव्हीची लागण एका व्यक्तीकडून दुसऱ्याला होऊ शकते. एचआयव्ही लैंगिक संबंधातून आणि इतर मार्गानेही पसरतो. रक्त, वीर्य, वीर्याच्या आधी बाहेर येणारा स्राव, योनीस्राव, आईचं दूध या स्रावांमधून एचआयव्हीचा विषाणू दुसऱ्याच्या शरीरात जातो.

  • एचआयव्हीची लागण झालेल्या व्यक्तीसोबत कंडोम न वापरता केलेल्या लैंगिक संबंधातून (संभोग, मुख मैथुन आणि गुदा मैथुन) लागण होऊ शकते.
  • एचआयव्हीची लागण होण्याचे बिगर लैंगिक मार्ग म्हणजे
  • निर्जंतुक न केलेल्या इंजेकशनच्या सुया.
  • दूषित रक्त आणि
  • प्रसूतीच्या वेळी आईकडून बाळाला एचआयव्हीची लागण होऊ शकते

लिंगसार्गिक आजार असतील तर एचआयव्ही होण्याचा धोका वाढतो.

पहिली गोष्ट ही की लैंगिक कल का बदलायचा आहे? समलिंगी कल व उभयलिंगी कल हे वेगेळेपण आहे, पण तो आजार नाही, विकृती नाही हे आधी लक्षात घ्या.

एखादी व्यक्ती भिन्नलिंगी वा समलिंगी वा उभयलिंगी का बनते याचे शास्त्रीय उत्तर मिळालेले नाही. जे समजले ते असे की भिन्नलैंगिकता, समलैंगिकता व उभयलैंगिकता शिकता येत नाही व शिकवताही येत नाही. आपला लैंगिक कल कोणताही असो, तो बदलता येत नाही. काही मानसोपचारतज्ञ सांगतात, की लैंगिक कल बदलता येतो पण या विधानाला कोणताही शास्त्रीय आधार नाही.
अन याला पर्याय का हवा आहे? जे निसर्गत: मिळालेले आहे ते बेस्ट आहे. त्याचा स्विकार करायला शिकायला लागेल इतकंच.

आमच्या वेबसाइटवर नव्याने प्रसिध्द होणार्‍या साहित्याबद्दल माहिती मिळवण्यासाठी सबस्क्राइब करा

letstalksexuality.com@gmail.com    आमच्या वेबसाइटवर नव्याने प्रसिध्द होणार्‍या साहित्याबद्दल माहिती मिळवण्यासाठी सबस्क्राइब करा

    letstalksexuality.com@gmail.com