युवासाठी

लैंगिकता समजून घेताना…

स्वत:चे शरीर, नातेसंबंध, लैंगिक संबंध, लैंगिक ओळख, लैंगिक कल, गरोदरपण, गर्भनिरोधन, आणि अशीच अधिक अचूक व वैज्ञानिक दृष्ट्या योग्य माहिती असल्यास त्याचा आपल्या आयुष्यातील वेगवेगळे निर्णय घेताना उपयोग होतो. प्रत्येक व्यक्तिला हयासंदर्भातील माहिती मिळवण्याचा व कोणत्याही दबावाशिवाय निर्णय घेण्याचा अधिकार आहे.

युवासाठी-लैंगिकता समजून घेताना…

लैंगिकता म्हणजे नक्की काय हा प्रश्न बऱ्याचदा गोंधळात पाडतो. लैंगिकतेचा अर्थ फक्त लैंगिक संबंध/ सेक्स किंवा त्याविषयीचे व्यवहार, वागणं असा घेतलेला दिसतो. पण लैंगिकता ही अधिक व्यापक संकल्पना आहे. आपली स्व–कल्पना, नाती, व्यक्त होण्याची पद्धत, आपले आयुष्याविषयीचे निर्णय हे सर्वच आणि याहूनही अधिक खूप!

आपले शरीर

मानवी शरीररचना, वयात येताना शरीरात होणारे बदल, मासिकपाळी, हस्तमैथुन, त्यासंदर्भातील समज- गैरसमज

पुढे वाचा

नातेसंबंध

नातेसंबंधामधील महत्त्वाची मूल्ये, नात्यांमधील दबाव व बंधने, प्रेम, आकर्षण, मैत्री, ब्रेक अप, पॅच अप.

पुढे वाचा

लैंगिक आरोग्य

एच आय व्ही व इतर लिंगसांसर्गिक आजार (STI’s), प्रजनन मार्गाशी निगडीत आजार, लैंगिक समस्या.

पुढे वाचा

प्रजनन आणि गर्भनिरोधन

गर्भधारणा कशी होते, गर्भनिरोधनाची विविध साधने, गर्भसमाप्ती (Abortion).

पुढे वाचा

लिंगभाव व लैंगिक ओळख

पुरुष किंवा स्त्री असणे म्हणजे काय?, LGBTQAI+, समलिंगी संबंध म्हणजे काय? विविध लैंगिक अभिव्यक्ती (sexual expressions).

पुढे वाचा

लैंगिकता आणि हिंसा

शारीरिक, मानसिक व लैंगिक शोषण किंवा हिंसा, विवाहांतर्गत शारीरिक जबरदस्ती, बाल-लैंगिक शोषण.

पुढे वाचा

लैंगिकता व मानसिक आरोग्य

लैंगिक समस्यांशी निगडीत मानसिक ताण तणाव, नैराश्य, चिंता, सेल्फ हार्म.

पुढे वाचा

अपंगत्व आणि लैंगिकता

विविध अपंगत्व असलेल्या व्यक्तींचे लैंगिक आरोग्य, अभिव्यक्ती, हिंसा, सुरक्षितता व अधिकार, पालकांसाठी व शिक्षकांसाठी मार्गदर्शन.

पुढे वाचा

लैंगिकता व कायदा

लैंगिकता व त्यासंदर्भातील विविध कायदे (पोक्सो, कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ, इ.), लैंगिक अधिकार.

पुढे वाचा

लैंगिकता व इंटरनेट

पोर्नोग्राफी, डेटींग अ‍ॅप, सायबर स्टॉकिंग, ऑनलाइन अ‍ब्युज.

पुढे वाचा

लैंगिकता व संस्कृती

प्राचीन काळापासून लैंगिकतेबद्दलच्या कल्पना, रुपके, मिथके कशी बदलत गेली यासंदर्भातील काही पुरातन कथा व विश्लेषण.

पुढे वाचा

व्हिडिओ

अमेज व्हिडिओ

पॉडकास्ट

इतर साहित्य

अमिला विचारा

शंका, प्रश्न, चिंता, टेन्शन…हे विचारू का? पण कोणाला विचारू? अशी शंका विचारली तर लोक काय म्हणतील? लैंगिकतेविषयीच्या प्रश्नांसंदर्भात आपल्या प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी हे विचार येऊन गेले असतील. ह्या विषयाबद्दल फारसे बोलले जात नाही. पण या विषयाबद्दलच्या मोकळ्या सवांदाने व योग्य माहितीने बरेच प्रश्न सुटू शकतात. त्यामुळे मनातल्या शंका, प्रश्न, गोंधळ अमिला सांगा. अमि एक बॉट असून तुम्ही अमिला लैंगिक आरोग्य, मैत्री, प्रेम, नातेसंबंध आणि अशा बर्‍याच विषयांबद्दल प्रश्न विचारू शकता. तुम्हाला जे वाटतंय् ते मोकळेपणाने अमिला विचारा. अमि त्याची उत्तरं देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. लैंगिकतेविषयी फारसे बोलले जात नसल्यामुळे त्यासंदर्भातील प्रश्न विचारताना वापरले जाणारे शब्द हे बहुतेक वेळा बोली भाषेतील किंवा शिव्यांमध्ये वापरले गेलेले असतात. पण अमिला ते शब्द कळणार नाहित व त्यामुळे तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळणार नाही. त्यामुळे आम्ही इथे एक लिंक देत आहोत ज्यात बोलीभाषेतील शब्दांना काही पर्यायी शब्द दिलेले आहेत जे तुम्ही अमिला तुमचा प्रश्न विचारताना वापरु शकता. जेणेकरुन अमिला तुमचा प्रश्न कळेल व त्याचे नेमके उत्तर देता येइल

महत्वाचे प्रश्न

सेक्स ही एकमेकांवरील प्रेमाची, शारीरिक ओढीची अभिव्यक्ती असू शकते. शरीराची गरज म्हणून देखील शरीरसंबंध ठेवले जाऊ शकतात. लग्नाआधी सेक्स करण्यात गैर काही नाही. मात्र जोडीदारांची संमती आणि एकमेकांवर विश्वास हवाच. फसवणुकीने किंवा बळजबरीने लैंगिक संबंध एवढी एकच गोष्ट लैंगिक संबंधांच्या संदर्भात अयोग्य मानता येते. अशा संबंधांच्या परिणामांची माहिती असणे आणि त्यांची जबाबदारी घेणे ही महत्वाचे असते.

पुरुषाच्या शरीरात हृदयाच्या एका ठोक्याला किमान 1000 शुक्राणू (पुरुषबीज) तयार होत असतात. ती बाहेर पडण्यासाठी वीर्यकोषांमध्ये एक पातळ पदार्थ म्हणजे वीर्य तयार होते. वीर्य सतत तयार होत असते आणि ते थोड्या काळापुरतेच साठवून ठेवता येते. हस्तमैथून केल्याने वीर्य वाया जात नाही. ते पुन्हा तयार होते. तसेच त्याचा पुढे मूल होण्यावर किंवा लैंगिक आरोग्यावरही काही परिणाम होत नाही.

जसे इतर वेळी कशालाही नाही म्हणणे जेवढे सोपे आहे तसेच सेक्स साठी ही नाही म्हणणे सोपे असले पाहिजे.  संभोग ही एकमेकांच्या संमतीने घडणारी गोष्ट आहे. जर तुम्हाला सेक्स करायचा नसेल तर तुमच्या पार्टनरला तसे सांगा. जर पार्टनर तुमच्यावर दबाव आणत असेल किंवा तुमच्याशी संबंध तोडण्याची धमकी देत ​​असेल तर हे नाते त्रासदायक असण्याचे लक्षण आहे. आणि जर तुमचा पार्टनर सेक्सला नाही म्हणत असेल तर त्यांच्या निर्णयाचा आदर करणे हे आपल्यासाठी खरोखर महत्वाचे आहे.

विश्वास, आदर आणि समजुतीवर आधारलेले नाते हे अधिक सुदृढ असते तर त्रासदायक नाते हे शारीरिक व भावनिकदृष्ट्या थकवणारे असू शकते. तुमचे दैनंदिन जीवनदेखील ते बिघडवून टाकू शकते. त्रासदायक नात्यामध्ये सर्वसामान्यपणे आढळणाऱ्या काही गोष्टी म्हणजे विश्वासाचा अभाव, संशयीपणा, नियंत्रण ठेवण्याची वृत्ती, वैयक्तिक सीमा स्पष्ट नसणे, स्वतःच्या गोष्टी करण्यासाठी किंवा इतर मित्रमंडळींना भेटण्यासाठी पुरेशी जागा नसणे, सार्वजनिक जागी अवमानास्पद वागवणे, भावनिक दबाव, बंधने, शारीरिक छळ, आत्महत्या करण्याच्या धमक्या इत्यादी. नात्यात होत असेल तर ते योग्य नाही. त्यासाठी मदत घ्या.

लोक याबद्दल देखील विचारतात

काही वेळा एखादा प्रश्न/शंका नेमक्या शब्दांमध्ये मांडता येत नाही किंवा इतरांनी विचारलेले प्रश्न आपल्याला कधी पडलेले नसतात व त्यांची उत्तरेही आपल्याला माहित नसतात. काही वेळेस प्रश्न पडलेले असतात पण विचारायला संकोच वाटतो. काही मित्र-मैत्रिणिंनी आम्हाला विचारलेले प्रश्न व आम्ही दिलेली उत्तरे तुम्हाला इथे वाचता येतील.

लिंगाची लिंगाची जाडी, लांबी आणि आकार किती असावा यासाठी काही विशेष मापदंड नाही. प्रत्येकाच्या लिंगाचा आकार आणि लांबी वेगवेगळी असते. शात्रीयदृष्ट्या सागायचे तर लिंग योनीत जाऊन त्यात शुक्राणू पोहचवण्याइतपत पुरेसे लांब असावे. लिंगाची जाडी, लांबी आणि आकार यात व्यक्ती परत्वे फरक असतो. सर्वसाधारणपणे उत्तेजित/ ताठरता आलेल्या लिंगाची लांबी ३- ५ इंच असते. लिंग किती मोठं आहे यापेक्षा ते ताठ होतं का, संबंधाच्या वेळी ते ताठ राहतं का किंवा लैंगिक सुख मिळतं का, तुमच्या जोडीदाराला तुम्ही लैंगिक सुख मिळवून देऊ शकता का हे जास्त महत्त्वाचं आहे. यात काही अडचण येत नसेल तर निश्चिंत रहा. काळजी करण्याचे काहीही कारण नाही. लिंगाचा आकार/साईझ वाढवण्याचा कोणताही शास्त्रीय उपाय नाही तसेच लिंगाचा आकार लहान असल्याने लैंगिक सुखात आजीबात बाधा येत नाही.

लिंगातील वाकडेपणा हा बऱ्याच पुरुषांना सतावणारा प्रश्न असतो परंतु नैसर्गिकरित्या सर्वच पुरुषांच्या लिंगाला थोड्या फार प्रमाणात बाक असतो. फार थोड्या पुरुषाचं लिंग अगदी सरळ असतं. या बाकामुळे संबंधांच्या वेळी काही अडचण येत नाही. परंतु संभोग करताना जर का वेदना होत असतील तर डॉक्टरचा सल्ला घेणं योग्य ठरेल. क्वचित केसेस मध्ये लिंगाचा वाकडेपणा खूप जास्त वाढलेला दिसतो व त्यामुळे लिंगाला योनीत किंवा गुदद्वारात प्रवेश करताना अडचण येते. शस्त्रक्रिया करून किंवा मेडिकल उपकरणांचा वापर करून लिंगाचा बाक कमी करता येऊ शकतो. फार काही त्रास होत नसेल तर काळजी करू नका. व्यक्ती तितक्या प्रकृती.

हस्तमैथुन केल्याने कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम होत नाहीत. उलटपक्षी हस्तमैथुन ही एक नैसर्गिक क्रिया आहे व स्वतःला लैंगिक आनंद देण्यासाठी ही क्रिया सर्वात सुरक्षित क्रिया आहे. शिवाय हस्तमैथुनातून आपल्याला आपल्या शरीरातील कोणते भाग लैंगिक दृष्ट्या सर्वात जास्त संवेदनशील आहेत हे कळण्यासाठी देखील मदत होते.

तुमच्या मैत्रिणीची पाळीची तारीख उलटून गेली असेल तर सर्वात आधी एक करा, दिवस गेले आहेत का याची खात्री करा. प्रेग्नन्सी टेस्ट करण्यासाठीची किट बाजारात मिळतात. त्यावरील सूचनांप्रमाणे लघवीची तपासणी केली तर दिवस गेले आहेत का हे समजू शकेल. जर टेस्ट निगेटिव्ह असेल तर थोडे दिवस पाळीची वाट बघा (मसिक पाळीचे चक्र नियमित असेल). पॉसिटीव्ह असेल तर तर स्त्रीरोगतज्ज्ञांना भेटा आणि तपासणी करा.

पाळी चक्रातील काही ठराविक दिवसांमध्येच गर्भधारणा होऊ शकते. अंडोत्सर्जन होण्याच्या आधी आणि नंतरचे ३-४ दिवस हा काळ गर्भधारणा होण्यासाठी सर्वात चांगला काळ मानला जातो.दर पाळीचक्रामध्ये (साधारणपणे २२ ते ३५ दिवसाचे एक चक्र) एक स्त्रीबीज पूर्ण तयार होऊन बीजकोषातून बाहेर येते व बीजवाहिन्यांमध्ये जाते. या प्रक्रियेला अंडोत्सर्जन (Ovulation) म्हणतात. प्रत्येकाच्या पाळीचक्रानुसार हा काळ वेगळा असू शकतो.

एखादी व्यक्ती गाढ झोपेत असताना त्यांस कामोत्तेजक स्वप्न पडतात. अशा स्वप्नांमुळे लैंगिक उत्तेजना तयार होते आणि झोपेतच वीर्यपतन होते. याला स्वप्नावस्था असे म्हणतात. याला नाईट फॉल असंही म्हणतात. बोलीभाषेमध्ये याला जरी स्वप्नदोष म्हणत असले तरीही यात काहीही दोष नाही. लैंगिक संबंध असो, हस्तमैथुन असो वा स्वप्नावस्था यामुळे होणारे वीर्यपतन ही मानवाच्या लैंगिकतेशी निगडीत अगदी सामान्य शारीरिक प्रक्रिया आहे. त्यामुळे ते का बंद करायचे इथून सुरुवात आहे. थोडक्यात सांगायचे झाल्यास हे बंद करण्याची काहीही गरज नाही. मात्र यामुळे तुमच्या मनात तुम्ही काहीतरी चुकीचे करत आहात असे वाटत असेल, भीती वाटत असेल, अपराधी वाटत असेल तर या नकारात्मक भावना मात्र दूर करा.

आमच्या वेबसाइटवर नव्याने प्रसिध्द होणार्‍या साहित्याबद्दल माहिती मिळवण्यासाठी सबस्क्राइब करा

letstalksexuality.com@gmail.com



    आमच्या वेबसाइटवर नव्याने प्रसिध्द होणार्‍या साहित्याबद्दल माहिती मिळवण्यासाठी सबस्क्राइब करा

    letstalksexuality.com@gmail.com